डीपी अपडेट…
ऑनलाइन ती ही असते. ऑनलाइन तो ही असतो.
बोलायचं दोघांनाही असतं. पण पहिला मेसेज समोरच्यानेच केला पाहिजे यांवरच गाडी अडलेली असते.
दोघेही सतत एकमेकांचे लास्ट सीन चेक करत असतात. बऱ्याच वेळ ऑनलाइन राहूनसुद्धा जेव्हा समोरचा मेसेज करत नाही तेव्हा मात्र मनातला राग हळूहळू बाहेर यायला लागतो. गूगल वर त्या परिस्थितीशी साधर्म्य दर्शवणारे images शोधले जातात. मग लगेच डीपी अपडेट किंवा स्टेटस अपडेट….मी किती एकटा आहे ,माझं कोणीच नाही आणि अजून बरंच काही…. पण होतं असं ज्या व्यक्तीसाठी आपण हे स्टेटस टाकतो त्याचा किंवा तिचा मेसेज सोडून सगळी दुनिया आपल्याला मेसेज करते.त्या क्षणापुरता सर्वांना आपली काळजी वाटत असते. अगदी ज्यांच्याशी आपण कधी जास्ती बोललो सुद्धा नाही असे कॉन्टॅक्टस सुद्धा आपल्याला काय झालं म्हणून विचारतात..
लास्ट सीन चेक करत बसण्यापेक्षा करून टाकायचा ना मेसेज..बोलून टाकायचं त्या व्यक्तीलाच जे बोलायचं आहे ते..मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी कशाला हव्यात डीपी, स्टेटस च्या कुबड्या…..
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
Its true…..the way of writing is remarkable …….
Too damn accurate bro..