Four years of Engineering life ❤


“Hello….”
“Hi…”
“What’s your name ?”
“सारंग..”
“मी आकाश…कोणत्या ब्रँच ला आहेस ??”
“EXTC… तू ?”
“मी पण…OHU आहेस?”
“नाही..मी मुंबई मध्येच राहतो..तू OHU आहेस का ??”
“हो..मी नाशिकचा..दादर ला हॉस्टेल वर राहतो…”

हे संभाषण बऱ्याच जणांच्या परिचयाचं असेल..आपल्या इंजिनीरिंगच्या पहिल्या दिवसाची सुरुवात हि काहीशी अशीच होते. आधीच एवढ्या मोठ्या कॉलेज मध्ये एकटे आल्यामुळे आपण थोडेसे घाबरलेले असतो आणि त्यात जर तुम्ही तुमचं घर सोडून शिक्षणासाठी लांब आला असाल मग तर काही विचारायलाच नको..अशा वेळी आपली नजर नकळतपणे आपल्या सारख्याच कोणाला तरी शोधत असते.. आणि जर तसं कोणी भेटलं तर मग मनावरचं बरंचसं ओझं कमी होऊन जातं.
थोडे दिवस गेले की मग हळू हळू आपण समोरच्याला समजायला लागतो..आवडी निवडी जुळल्या कि मग आपोआप आपला एक ग्रुप बनतो..आणि एकदा का ग्रुप बनला कि मग काय…दिवस कसे भुर्रकन निघून जातात आपल्याला कळत सुद्धा नाही..लेक्चर बंक करून क्रिकेट खेळणं, फिरायला जाणं, पिक्चरला बघणं.. असं सगळं सुरु होतं.. मग त्या ग्रुप मध्ये कोणतरी लैला/मजनु तयार होतो. त्याची सेटिंग लावण्यासाठी अख्खा ग्रुप मेहेनत घेतो..कधी तरी यश पदरी पडतं…नाही तर मग फक्त friendship वरचं समाधान मानाव लागतं.

ग्रुप स्टडी च्या नावाखाली नाईट मारल्या जातात.. ग्रुप मधला कोणी जर एकटाच रूम वर राहत असेल तर नाईट मारायला ते एक हक्काचं ठिकाणचं असतं.
फेस्ट चे ते तीन चार दिवस तर एकदम धमाल असते. DJ नाईट ला तर आपण वेड्यासारखे नाचतो. अगदीच जर नाचता येत नसेल तर गणपती डान्स असतोच…
Viva ला तर आपला अपमान हा ठरलेलाच असतो.कितीही अभ्यास करून गेलं तरी external जे प्रश्न विचारेल त्याची उत्तर आपल्याला कधीच देता येत नाही. Semester exam साठी कितीही दिवस सुट्टी असली तरीसुद्धा अभ्यास मात्र शेवटच्या रात्रीच होतो..(काही अपवाद वगळता). शेवटचा पेपर  संपायच्या आधी आपले vacation चे प्लॅन्स रेडी असतात.
Last year ला सर्वात जास्ती बंक होतात ती प्रोजेक्ट्स च्या नावावर..संपूर्ण एक वर्ष वेळ दिलेला असतो प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी..पण डेडलाईन कधीच न पाळणारे आपण तो शेवटच्या काही महिन्यातच सुरु करतो.
सुरुवातीला सगळे जण ‘कशी संपणार हि चार वर्षे…’ असाच विचार करत होते पण आता जेव्हा संपायला आली तेव्हा वाटतंय कि हि चार वर्षे एवढ्या लवकर नव्हती संपायला पाहिजे…कॉलेज संपलं..सगळ्यांना पुन्हा रोजच्या सारखं भेटता येणार नाही..ज्या आठवणी आहेत त्या आठवणी सोबत घेऊन पुढे जायचंय..
आता कोण आमचा पाय खेचणार, कोण आम्हाला फालतूचे सल्ले देणार… कोण नेहमी आमच्या बाजूने उभे राहणार…कोण आता आम्हाला नवीन नवीन नावे पाडणार…आता कोण आमच्याशी कारण नसताना भांडणार… कोणाशी आम्ही वायफळ चर्चा करणार…
कोण आम्हाला अपयश आल्यावर दिलासा देणार…चुकून जास्त मार्क्स मिळल्यावर कोण शिव्या घालणार…कोण आता आमचा टिफिन संपवणार…
असे मित्र पुन्हा कुठे भेटणार जे नेहमी आपलीच खेचायचे पण जर दुसरा कोणी आपल्याला काही बोलला तर लगेच आपल्या बाजूने उभे राहायचे…कोण आता आम्ही कोणत्या मुलीशी किंवा मुलाशी बोललो तर आम्हाला चिडवून चिडवून त्रास देणार..कोण आता आम्हाला मागून हाक मारून समोर बघ रे..असं सांगणार..कोण आता फिरायला जाण्यासाठी एका पायावर तयार होणार…

लोकांच्या दृष्टीने आमचे कॉलेज चे दिवस संपले जरी असले…तरी या कॉलेज शी आणि कॉलेजच्या friends शी आमची नाळ जुळलेली आहे…आणि ती तशीच कायम राहील..आमच्यातलं कोणी परदेशी जाईल, काही जणांची लवकर लग्न सुद्धा होतील..पण इतक्या वर्षाच्या ज्या आठवणी आहेत त्या कधीच पुसता येणार नाहीत….

–                                                                                                                                     प्रतिक प्रवीण म्हात्रे

3550cookie-checkFour years of Engineering life ❤

Related Posts

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

गुन्हेगार

गुन्हेगार

7 Comments

  1. Wow 😍 amazing…So deep…!!! Flashback memories 😇🙆one of the best blog 😎✌️

  2. Great. Fantastic. Very good language. Languid and easy to understand.
    Your blog has refreshed my memories of my four years of engineering. It is as if, I just completed my four years yesterday.
    By reading your blogs, I have improved my Marathi language.

Leave a Reply

Blog Stats

  • 120,410 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories