आठवणीतला प्रवास…(भाग ४)

जसं हॉटेल नजरेच्या टप्प्यात आलं तसा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा ताण बराचसा कमी झाला. हॉटेल मध्ये पाऊल ठेवलं तेव्हा समजलं की नशीब अजूनसुद्धा आमच्यावर रुसलेलंच आहे. रात्रभर snowfall झाल्यामुळे लाईट नव्हती. सगळ्यांच्या मोबाईलची बॅटरी संपत आलेली. आणि हीटर बंद असल्यामुळे पाणी सुद्धा बर्फासारखं थंड. कसंतरी फ्रेश होऊन आम्ही रूममध्ये गेलो तेवढ्यात साधारण सहा वाजता आमचं लंच तयार आहे हे सांगायला हॉटेलचा माणूस आला. अजून दुसऱ्या दोन बस यायच्या होत्या. आम्ही contact करण्याचा प्रयत्न केला पण कॉल लागत नव्हता. थोडा अंधार झाला तसं हॉटेलच्या मालकाने आम्हाला कॅडेल्स आणून दिल्या.. एकदम कॅम्पला आल्याचा feel येत होता.. मोबाईल नाही, लाइट नाही…

थोडी रात्र झाली आणि दुसऱ्या बस मधली काही मुलं हॉटेल वर पोहोचली. थोडी घाबरलेलीच वाटत होती..खाली त्यांना एक जीप मिळाली. त्यात सामान आणि मुलींना बसवून सगळी मुलं पायीच हॉटेल कडे निघाली होती. पण नंतर त्यांना कळलं कि थोडं अंतर पार करून जीप रस्त्यातच बंद पडली आहे. जीप मधल्या मुलींची अवस्था तर खूप वाईट झाली होती. आधीच थंडी आणि त्यात हे सगळं..कोणाशी contact सुद्धा होत नव्हता. आम्ही त्यांना शोधायला बाहेर पडणार तेवढ्यात त्यांची जीप आली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

जे नंतर आले त्या सगळ्यांची अवस्था आमच्यापेक्षा वाईट होती. सगळ्यांनाच थंडी भरली होती. हातपाय सुन्न झाले होते. तोंडातले उचचारही स्पष्ट येत नव्हते…अशा परिस्थितीत सर्व भांडण, हेवेदावे बाजूला सारून एकमेकांना मदत करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या वेळी सर्वांनी एकमेकांची जी काळजी घेतली ना..त्याला तोड नाही..हे सर्व बघून मला मात्र युधिष्ठिराच्या ‘ अंतर्गत कलहामध्ये आपण पाच आणि ते शंभर आहेत, पण जेव्हा शत्रू समोर असेल तेव्हा आपण एकशे पाच आहोत ‘ या उपदेशाचीच आठवण झाली.

त्या दिवशी थकल्यामुळे लवकर झोपू असंच सगळ्यांनी ठरवलं होतं. पण मग नंतर गप्पा रंगल्या आणि कोणाची विकेट कधी पडली कळलंच नाही..
–                                                                                                                                        प्रतिक प्रवीण म्हात्रे
3490cookie-checkआठवणीतला प्रवास…(भाग ४)

Related Posts

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 115,815 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories