EGO
एक वेळ होती…ती whats app वर online येण्याची…तो वाट बघायचा..त्याच्याकडे नेटपॅक होतं..ती वायफाय वर online यायची..ती परत offline जाईल, तिला reply दयायला उशीर होईल म्हणून त्याच नेट सतत चालू असायचं…तिचा मेसेज आल्यावर एका मिनिटाच्या आत त्याचा reply असायचा…आणि ती म्हणायची….”संपूर्ण दिवस online असतोस…इतका कोणाशी बोलतोस…😅”
तिने स्वतःहून मेसेज करायची वाट न बघता तो नेहमी मेसेज करायचा…त्यांचं chat त्याच्याच मेसेज ने सुरु व्हायचं..असे बरेच दिवस गेले…आणि शेवटी ego आड आलाच…नेहमी मीच मेसेज करतोे…तिला माझी आठवण येत नाही का कधी??? कि मी मेसेज करतो म्हणून नाईलाजाने बोलते ती माझ्याशी…मलाच गरज आहे का तिची ??? तिला कधी वाटत नाही का स्वतःहून काहीतरी शेअर करावं असं…आता तिनेच मेसेज करू दे…मी नाही करणार….झालं…..एक दिवस गेला…दोन दिवस गेले….आठवडा गेला…महिना सरत आला…तरी तिचा काही मेसेज नाही…या महिन्याभरात त्याची अवस्था सुद्धा काही फार चांगली नव्हती..बऱ्याचदा त्याने मेसेज type केला…send दाबायच्या आधीच पुन्हा ego आड यायचा आणि तो मेसेज delete करायचा…
आणि एक दिवस दोघे कॉलेज मध्ये समोरासमोर आले..नेहमीच्या गळाभेटीची जागा एका जबरदस्तीच्या smile ने घेतली होती…आणि त्या दिवशी शेवटी त्यालाच राहवलं नाही..त्यानेच मेसेज केला….
” मी मेसेज केला नाही तर तू स्वतःहून करणारच नाहीस ना कधी…तुला काही म्हणजे काहीही वाटत नाही ना माझ्याबद्दल…इतके दिवस नाईलाजास्तव बोलत होतीस का माझ्या बरोबर…एकदा सांगून तरी बघायचं होतंस..तूझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेलो असतो मी…तुला माझी गरज नव्हती आणि मी उगाच वेड्या सारखा तुझी काळजी करत बसायचो…”
” नाही रे….उलट या काही दिवसात मला खरंच खूप गरज होती तुझी….बाबा गेले…आणि त्या आई अजून त्या धक्क्यातून सावरली नाहीये…मला खुप आठवण येत होती तुझी…सारखं वाटत होतं की तुला भेटावं आणि तुझ्या खांद्यावर डोक ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी…पण नेहमी तूच मेसेज कारायचास ना मला..मी नाही केला तरी..आणि तू केलाच नाहीस…मला वाटलं कि तुला आता माझी आठवण येत नसेल….मला अनेकदा असं वाटलं..कि तुझ्याशी बोलावं..पण मग मनात विचार यायचा कि उगाच का आपण त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करावी…त्याचं आयुष्य छान चाललंय तर त्याला उगाच आपलं टेन्शन का सांगावं….. मला खरंच खूप गरज होती रे तुझी….पण तू नव्हतास माझ्या सोबत….”
या गोष्टीचा शेवट काय व्हायचा तो होईल…पण खरंच या ego मुळे आपण अनेकदा आपली हक्काची माणसं गमावतो..जर तो थोडासा बाजूला ठेवला तर आयुष्य किती सुंदर होऊ शकतं…
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
खरंच आहे….अगदी मनातलं शब्दात मांडलंस….👌👌👌😍
thanks apurva
किती सोपे आणि सरळपणे सांगितलं
thank you
Ego❌
thanks brother