प्रेम ❤

​असं म्हणतात की पहिलं प्रेम हे खरं प्रेम असतं. ते आपण विसरुच शकत नाही. ते आयुष्यभर सोबत असतं. आपल्याला कोणीतरी मनापासून आवडु लागतं.मग त्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे कसं जाईल या साठी आपण प्रयत्न करू लागतो. त्या व्यक्तीच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागतो आणि मग बघता बघता नकळत आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. कधी आणि कसं हे आपल्याला सुद्धा कळत नाही. प्रत्येक प्रेमाची सुरवात मात्र ” मला ती आवडते..प्रेम आहे की नाही हे माहित नाही ” यानेच होते. जर तुम्ही शाळेत असाल तर नकळत तिच्यासाठी जागा ठेवणं, तिची वाट पाहणं, तिच्याकडूनच नोट्स घेणं… असं सगळं सुरु होत. कॉलेज ला आल्यावर मग सगळं common वाटायला लागतं. Gf, Bf, relationship हे शब्द तर आपण अगदी बाराखडी बोलल्यासारखे बोलू लागतो.

        कधी कधी तर प्रेमाची सुरवात हि इतरांच्या चिडावण्याने होते. त्या व्यक्तीबद्दल आधी काही वाटत नसलं तरी नकळतपणे आपण तिचा विचार करायला लागतो. पण त्या वेळी एकतर बोलून दाखवायची हिंमत नसते किंवा आपण तेव्हा इतके गबाळे असतो की कुठलीही मुलगी आपल्या प्रेमात पडणार नाही असं आपलं आपणच ठरवून टाकतो.

       अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे आपल्याला कोणी आवडतं हे त्या व्यक्तीला सोडून सर्वांना माहीत असतं. बऱ्याचदा आपलं पाहिलं प्रेम अपूर्ण राहतं कारण तेव्हा एकतर आपल्याला प्रेम म्हणजे काय हे कळलेलं नसतं. जरी कळलं तरी ते नातं कसं निभावायचं हे आपल्याला माहित नसतं.

          बऱ्याचदा तर आपण मागचा पुढचा कसलाही विचार न करता प्रेमात पडतो. आणि मग लग्नाचं वय झालं की घरचे लग्नासाठी मागे लागतात. तेव्हा जर घरच्यांना खरं काय ते सांगायची हिंमत झाली नाही तर मग पुढे सर्वांनाच त्याचा त्रास भोगावा लागतो. घरच्यांना काही माहीत नसल्याने ते एखादा चांगला मुलगा किंवा मुलगी बघून तुमचं लग्न लावून देतात .आणि मग ती मुलं त्यांच्या आधीच्या प्रियकर/प्रेयसी बरोबर पळून जातात.जर तुम्हाला पळून जायचंच आहे तर मग तुम्ही तुमच्या घरच्यांच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या भावनांशी का खेळता ?? तुम्ही उचललेल्या या पाऊलामुळे तुमच्या घरच्यांना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते याचा विचार तुम्ही तेव्हा का करत नाही? 

   प्रेम करा.. त्या बद्दलं माझं काही म्हणणं नाही. पण प्रेम करताना तुम्ही जर तुमच्या घरच्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या तर मग नंतर कोणावरही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.

Happy Valentines day 💕💝

–                     प्रतिक प्रवीण म्हात्रे

2590cookie-checkप्रेम ❤

Related Posts

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

2 Comments

  1. Prem ha kahi vyavhar nahi …kiva mg samjun umjun hi hota nasat…ti fakt ek sundar bhavana ahe ji aplyala swatashi ch navyane olakh karun dete…!!

    Bdw nice article😉😉

  2. Khup sundar article….
    Pan prem asa vichar karun karta yet nai…te aapoaap houn jaata…rahila prashna gharchyanchya apeksha tr baki saglya apeksha purna karna aplya hatat astat pn prem ani lagna ya madhe aapn aplya manacha ani aplya future cha jast vichar kela Pahije…asa mla vatta…pratyekacha drushikon vegla asu shakto…!!!!

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories