स्त्री आहेस तू…

स्त्री आहेस तू
म्हणून स्वतःला कमी समजू नकोस….

दुःखातही तू एकटे सोडत नाहीस
परिणामांचा विचार केल्याशिवाय तुझे पाऊल कधी उचलत नाहीस
आशावादी सुद्धा तूच बनवतेस
जगण्याची दिशा हि तूच दाखवतेस

तू पंतप्रधान होऊ शकतेस
आणि अंतराळवीरही
तू घरही सांभाळू शकतेस
आणि देशही

स्त्री आहेस तू
म्हणून अत्याचार सहन करू नकोस
कोणी जर त्रास दिला
तर त्याच्या कानाखाली आवाज काढायलासुद्धा
मागे पुढे बघू नकोस

संसार हा तुझ्याविना नेहमीच कोलमडून पडतो
तू नसशील तर आयुष्याला अर्थ नसतो
घराला घरपण असण्याचं कारणहि तूच आहेस
प्रत्येक पुरुषाची खरी ताकदही तूच आहेस

तुझ्यामुळेच तर घडले किती तरी युगपुरुष
पाठीशी होतीस म्हणून तर झाले हे स्वराज्याचे स्वप्नं साकार
तुझेच तर आहे या जगात अनन्यसाधारण महत्व
कारण तूच तर घडवतेस देऊन या जीवनाला आकार

जगण्याची उमेदही तूच आहेस
स्फूर्ती हि तूच
या जगातल्या चांगुलपणाचं
एक कारण हि तूच

तू भावनांनी भरलेलं भांडार आहेस
स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यांसाठी संसार आहेस
तुझ्याकडून मिळणारा जीवनाचा आधार आहे
तुझ्याविना या जीवनात फक्त अंधार आहे
स्त्री आहेस तू
म्हणून स्वतः ला कमी समजू नकोस
नारीशक्ती हि पुरुषाच्या यशाचं कारण आहे
हे कधीही विसरू नकोस

–                                     प्रतीक प्रवीण म्हात्रे

690cookie-checkस्त्री आहेस तू…

Related Posts

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

जगण्यात मौज आहे…

जगण्यात मौज आहे…

ओळख

32 Comments

  1. खूप सुंदर लिहिले आहे… मस्त…😊

Leave a Reply

Blog Stats

  • 114,878 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories