
Articles
Engineer’s Day
Engineer’s Day
Engineer…
काहींसाठी meme मटेरियल
तर काहींसाठी स्वप्न,
काहींसाठी बदल घडवण्याचा ध्यास
तर काहींसाठी उगाच त्यांच्यावर लादलेलं ओझं.
ह्या दोन गोष्टींचा समन्वय जो साधतो तो Engineer,
आवडत्या फिल्डमध्ये एखादा नवीन शोध लावतो किंवा एक्सिस्टिंग सिस्टिम अधिक सोपी बनवतो तो Engineer,
प्रतिष्ठितांच्या गराड्यात गबाळ्यासारखा राहून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो तो Engineer,
कोरोनाच्या कठीण काळात घरून किंवा ऑफिसमधून काम करून सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करतो तो Engineer.
पण आता Engineer होतायेत कुठे,
आयुष्यातल्या रेसचे घोडे तयार होतायेत फक्त.
अमुक तमुकच्या नावावर हजारो Engineering कॉलेज काढली पण गुणवत्तेकडे लक्ष दिलंच नाही कुणी,
ज्ञानाला पॉईंटरच्या मापात मोजण्यास सुरुवात झाली आणि तिथेच खरा Engineer हरला.
उत्सुकता, आवड हे सगळं जाऊन फक्त कुणीतरी आधीच सेट केलेल्या बेंचमार्कला प्रमाण मानून त्यानुसार वागायचा प्रयत्न सुरु झाला.
आवडतंय म्हणून टेक्निकल गोष्टीत रस घेण्याची मानसिकता कमी होऊन जॉब मिळतो म्हणून इतरांच्या सांगण्यावरून Engineering स्वीकारलं गेलं
आणि मग आवडतं काम मिळालं नाही म्हणून नकारात्मक भावना निर्माण झाली .
Happy Engineer’s Day 























No Comment