महाराज 🚩

महाराज 🚩

छत्रपती शिवाजी महाराज,
मानाचा मुजरा.

संपूर्ण भारतवर्षावर साचलेलं परकीय शक्तींचं मळभ दूर करण्यासाठी शिवनेरीवर एका तळपत्या सूर्याचा जन्म झाला. आज जवळपास चारशे वर्षांनंतरही त्या सूर्याच्या तेजापुढे संपूर्ण जग नतमस्तक आहे. संपूर्ण जगभरात तुमच्या व्यवस्थापनेचे धडे गिरवले जातात. त्या बाबतीत आम्ही जरा करंटेच ठरतो. कारण आज जग तुमच्याकडून शिकत असताना आम्ही तुम्हाला समजून घ्यायला थोडेसे कमी पडतोय राजे. स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवतो आम्ही. पण फक्त नावापुरतच. तुमची शिकवण, तुमचे विचार आम्ही कधीच मागे टाकले आहेत.

आजकाल तुमच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर केला जातोय.
तुम्ही सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं. पण आज तुमचं स्वराज्य ह्याच जातीधर्मामुळे विभागलं गेलं आहे राजे. स्वतःचा धर्माचा अभिमान बाळगावा, पण इतरांच्या धर्माचा, जातीचा अपमान करू नये ही तुमची शिकवण आम्ही विसरलो आहोत. स्वतःला श्रेष्ठ ठरवण्याच्या नादात आम्ही तुमच्या विचारांची पायमल्ली करत आहोत.

तुमच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्य्यांवर आम्ही पार्ट्या करतोय, दारूच्या बाटल्यांचा खच पाडतोय. ज्या तटांच्या रक्षणासाठी रक्ताची होळी खेळली गेली त्या तटांवर आम्ही नावे कोरतोय, बदाम काढतोय. गडकिल्य्यांचं संवर्धन हे काही विशिष्ट लोकांचं कर्तव्य समजून बाकी आम्ही सगळे त्याकडे अगदीच दुर्लक्ष करतोय. राजस्थान आणि उत्तरेकडील अनेक राजेमहाराजांचे महाल आज सुस्थितीत आहेत. लोकं नेहमीच ह्याबद्दल म्हणत असतात. पण त्यांना मला हे सांगावसं वाटतं की जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यांच्या माना झुकल्या होत्या आणि जेव्हा जेव्हा सह्याद्रीच्या गडकिल्य्यांवर हल्ले झाले तेव्हा त्यांनी तोफांचे गोळे त्यांच्या छातीवर झेलले होते. त्या ढासळलेल्या गडांच्या बुरुजासोबतच तुमचा आमच्यावर असलेला विश्वाससुद्धा ढासळत असेल ना???

आम्ही खूपच कमकुवत झालो आहोत राजे. जराशा संकटांना घाबरून आम्ही टोकाचं पाऊल उचलून मोकळे होतो. पण तुमचा ज्वलंत इतिहास आमच्यासमोर असताना आम्ही त्याकडे पार डोळेझाक करतो. पुरंदरच्या तहाने जवळजवळ लयाला गेलेले राज्य त्याच धुळीतून पुन्हा उभारून त्याला अजिंक्य बनवण्याचं तुमचं उदाहरण समोर असताना आम्ही इतरांचे प्रोत्साहनपर व्हिडिओ पाहण्यात धन्यता मानतो.

झोपेचं सोंग घेऊन पेंगणाऱ्या ह्या तुमच्या मावळ्यांच्या मनात पुन्हा एकदा शिवविचार जागवायला हवा. कारण आताच्या पिढीने जर तुमचा इतिहास,तुमचे विचार जतन केले नाहीत तर येणाऱ्या पुढल्या पिढीला तुमच्याबद्दल आत्मीयता वाटणार नाही आणि मग आता जसे रामायण, महाभारताच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तसेच पुढल्या काही शतकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ खरंच होते की केवळ एक काल्पनिक व्यक्तिमत्त्व होतं?? असा प्रश्नही उपस्थित केला जाईल. आणि ते वेळ येऊ नये म्हणून तुमचा वारसा पुढल्या पिढीकडे सुपूर्त करणं, त्यांना शिवविचारांची गोडी लावणं हे आमचं आद्यकर्तव्य आहे आणि आम्ही ते नक्कीच पार पाडू. कारण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले त्यांना आयुष्यातली कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही.

हर हर महादेव….

©PRATILIKHIT

22830cookie-checkमहाराज 🚩

Related Posts

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा??

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा??

मराठीचा मानापमान

मराठीचा मानापमान

बुलबुलांचं रुटीन

बुलबुलांचं रुटीन

ये है मुंबई मेरी जान…

ये है मुंबई मेरी जान…

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 234,381 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories