Uncategorized
शिवराज्याभिषेक
काळ सोळाव्या शतकाचा
शासक बहु माजला होता
करण्या पतन म्लेच्छांचे
शिवनेरी सिंह जन्मला होता
गिरवी धडे तो शास्त्राचे
सोबत शस्त्रांचे प्रशिक्षण
ध्यानी मनी स्वराज्य स्वप्न
मुखी तेज ते विलक्षण
मर्दुनी परकीय स्वकीय
रणकंदन ते आरंभले
घेऊन बाल सवंगड्यांना
शिवराज्य ते स्थापियले
आली जीवावर संकटे
सरदार उभे ठाकले
जगावा पोशिंदा म्हणुनी
मृत्यूला उराशी कवटाळले
स्वप्न जाहले साकार
दिस तो सोनियाचा
दाही दिशांतुनी घुमला
जयजयकार शिवछत्रपतींचा
साडेतीनशे वर्षांनंतरही
रक्त आमुचें सळसळते
छत्रपती शिवाजी महाराज कि ऐकताच
जय आपसूकच मुखी येते
© PRATILIKHIT
No Comment