Uncategorized
आणि काय हवं…
आणि काय हवं…
कधी तरी कामवालीला सुट्टी देऊन
सर्वांना आवडते म्हणून आखलेला पावभाजीचा बेत
घरच्यांपासून कितीही लांब असलं
तरी सणासुदीला आईच्या हातची पुरणपोळी
आणि काय हवं…
पावसाच्या बहाण्याने मिळालेली
एक सक्तीची सुट्टी
मस्त आलं टाकून बनवलेला चहा
सोबत गरमागरम कांदाभजी
आणि काय हवं…
फिटनेस च्या जमान्यात सकाळी जिमला जाऊन
नंतर दिवस भर मनसोक्त खाणं
कॅलरी वगैरे चा विचार न करता
आवडेल ते खाऊनही न वाढलेलं वजन
आणि काय हवं…
तशी सोशल मीडियाच्या जमान्यात हरवलेली
पण अडीअडचणीच्या वेळी धावून येणारी
मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता
प्रसंगी पाठीशी उभी राहणारी नाती
आणि काय हवं…
© PRATILIKHIT
No Comment