तू गेल्यानंतरचा नवीन मी..

आठवतेय का तुला

वर्ग शोधत असतानाच
अचानक भेट झाली होती
गोंधळलेली होतीस तरीसुद्धा
नजरेला नजर भिडली होती

कधीही लेक्चरला न बसणारा मी
त्यानंतर मात्र वर्गातच दिसायचो
तू बाजूला येऊन बसावं म्हणून
शेजारची जागा रिकामी ठेवायचो

मनातली गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचवायला
मैत्रिणीचा आधार घ्यावा लागला
अंधारात मारलेला प्रेमाचा तिर
नेमका तुझ्या वर्मी लागला

काही कारणांमुळे वेगळे झालो
समाधान हेच की सांगून गेलीस
जुन्या आठवणी ठेवून जाताना
मला मात्र बदलून गेलीस

दुधाने तोंड भाजल्यामुळे
ताक सुद्धा फुंकून पिऊ लागलो
आपलीच माणसं विश्वासघात करतात म्हणून
स्वतःवरचा विश्वाससुद्धा गमावून बसलो

आभार मानायचे तर त्या लेखणीचे
जिने जगण्याची नवीन उमेद दिली
कुणालाच माहीत नसलेली गोष्ट
नकळत कागदावर उतरवली

दुसऱ्या महायुद्धातील जपानसारखा
आता मी सुद्धा सावरलो आहे
एकटेपणाची सवय व्हावी म्हणून
स्वतःवरच प्रेम करू लागलो आहे

©प्रतिक प्रवीण म्हात्रे

(वरील कविता पूर्णपणे काल्पनिक असून तिचा वास्तवाशी काही संबंध नाही आणि तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

7500cookie-checkतू गेल्यानंतरचा नवीन मी..

Related Posts

Engineer

Engineer

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

जगण्यात मौज आहे…

जगण्यात मौज आहे…

3 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 121,012 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories