Insecurity 💑

आजकालच्या बऱ्याच रिलेशनशिप तुटण्यामागचं महत्वाचं कारण… अगदी तुम्ही कितीही serious असाल, किंवा तुमचं कितीही प्रेम असेल तुमच्या जोडीदारावर…तरीसुद्धा आपला जोडीदार आपल्यापेक्षा जास्ती दुसऱ्या कोणाला तरी महत्व देतोय, त्याच्यासोबत जास्त वेळ घालवतोय ही भावनाच मुळी आपल्याला सहन होत नाही.

एकदा का आपण रिलेशनशीप मध्ये पडलो की मग आपण त्या व्यक्तीला आपली खासगी मालमत्ता समजायला लागतो..त्या व्यक्तीने आपल्याशीच बोलावं, आपल्या बरोबरच राहावं, आपल्या बरोबर सर्वात जास्त वेळ घालवावा असं आपल्याला नेहमी वाटत राहतं. यात काही गैर नाहीये म्हणा…पण नेहमीच ते शक्य होईल असं नाही ना…

जर तुम्ही एकाच कॉलेजमध्ये असाल, किंवा एकाच ठिकाणी नोकरीला असाल तर काही प्रमाणात या सगळ्या गोष्टी शक्य होतीलही पण बऱ्याचदा असं होतं की रोज भेटणं , बोलणं होत नाही. कारण दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात. त्यात कामाचा व्याप जास्त असला की मग आपण इतके थकून जातो की एकमेकांना हवा तसा वेळ देऊ शकत नाही.

बऱ्याचदा असं होतं की रिलेशनशिप मध्ये यायच्या आधी आपल्या जोडीदाराचा खूप जवळचा मित्र किंवा मैत्रीण असते. साहजिकच तो किंवा ती त्यांच्याशी जास्त comfortable असणार..कधीतरी असंही होतं की जेव्हा तुम्ही कॉलेजमधून passout होता तेव्हा मग नोकरीमुळे किंवा पुढील शिक्षणामुळे तुम्ही एकमेकांपासून दूर जाता आणि त्यातही जर तुम्ही बाहेरगावी असाल तर तुम्हाला दुसरे मित्रमैत्रिणी बनवण्यावाचून पर्यायच उरत नाही. अब्दुल कलाम यांच्या ‘wings of fire’ मध्ये त्यांच्या शिक्षकांचं एक वाक्य आहे.

‘ Whenever human beings find themselves alone, as a natural reaction, they start looking for company. Whenever they are in trouble, they look for someone to help them. Whenever they reach an impasse, they look to someone to show them the way out. ‘

आणि ते अगदीच पटण्यासारखं आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसोबत जास्त वेळ घालवता तेव्हा कालांतराने ते सुद्धा तुमचे खूप चांगले मित्र होऊन जातात. आणि नंतर काही काळाने तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या जवळ आलात आणि तुमचे ते मित्रसुद्धा तुमच्या जवळ असतील तर मग भेटीगाठी या होणारचं..

जर तो किंवा ती त्यांना भेटत असेल , त्यांच्याशी बोलत असेल, काही गोष्टी शेअर करत असेल तर त्याच आपल्याला वाईट का वाटावं ?? पण तरीसुद्धा आपल्याला वाईट वाटत…त्याचं कारण काय हे मलाही अजून नीटसं कळलेलं नाहीये पण जर आपल्याला काही वाटत असेल तर आपण ते समोरच्याला सांगून टाकावं.आपण त्याच्यावर बंधनं तर टाकू शकत नाही पण कमीतकमी आपण त्या व्यक्तीला आपल्याला काय वाटतंय ते सांगितलं तर आपलं नात टिकण्यास मदतच होईल..कारण आपल्याला जे काही वाटतं ते फक्त आपल्या मनात ठेवलं तर त्याचा परिणाम त्या नात्यावर नक्कीच होणार….. कधी न कधी ती गोष्ट बाहेर येणारच….त्या पेक्षा बोलून टाकायचं आपल्याला काय वाटत ते…उगाच मनात ठेवून कॉम्प्लिकेशन्स वाढवण्यापेक्षा वेळच्या वेळी गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्या….बरेच जण सांगतात की आपला आपल्या जोडीदारावर विश्वास हवा…विश्वास असतोच ना..पण तरीसुद्धा आपल्याला या गोष्टीचं वाईट वाटतंच… जर असा कोणी आहे ज्याला या सगळ्या गोष्टींचा अजिबात फरक पडत नाही तर मला त्या व्यक्तीला भेटायला नक्कीच आवडेल….

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

5645cookie-checkInsecurity 💑

Related Posts

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 114,878 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories