महाराज 🙏🗡🛡

​अगदी गेल्या आठवड्यातला प्रसंग..विरार दादर लोकल मध्ये प्रवास करताना कानावर पडलेले शब्द..’ अरे त्या CST स्टेशन ला आता शिवाजीचं पूर्ण नाव दिलंय.. कशाला उगाच change करायचं…कोण पूर्ण नाव बोलणार तरी आहे का ??’

मी यावर काही बोलणार एवढ्यात एका उत्तर भारतीय व्यक्तीने त्या माणसाला थांबवलं..साधारणतः साठ सत्तर पर्यंत वय असावं त्यांचं..

“बेटा.. पुरे महाराष्ट्र मे शिवाजी महाराज को आराध्य माना जाता है तो उनका पुरा नाम लेने मैं आपको शरम क्यो आती है??  अगर वो नहीं होते तो आज तुम भी यहां शांतिसे जी नही पाते..जब भी आप इस महापुरुष का नाम लोगे तो आदर से लो..शिवाजी नही शिवाजी महाराज बोलो..”

एक उत्तर भारतीय माणूस एका मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदराने घेण्यासाठी उपदेश करतोय ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी..आपलं आराध्य दैवत असलेल्या महाराजांना आपण आदर नाही देणार तर आपण दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करू शकतो..

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वडीलधाऱ्यांना आदराने संबोधलं जातं.. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे राजे होते..मायबाप होते..तर त्यांना तर आपण आदर दिलाच पाहिजे..आज जर महाराज नसते तर संपूर्ण भारताची काय अवस्था झाली असती हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायला नको…त्यामुळे शिवाजी न म्हणता छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला शिका…महाराजांचा मान त्यांना दिलाच पाहिजे..

‘प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ‘

– प्रतिक प्रविण म्हात्रे

4230cookie-checkमहाराज 🙏🗡🛡

Related Posts

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 114,924 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories