न्यूनगंड  (Inferiority complex)


प्रवास करताना, कॉलेजला जाताना किंवा एखाद्या लग्न समारंभाला जाताना आपण आपल्या लुक्स चा किती विचार करत असतो…आपण चांगले दिसतोय का ?? चारचौघांनी आपल्याला बघितलं तर काय बोलतील आपल्या बद्दल…आताच्या फॅशनच्या चालू ट्रेंड नुसार आपली ड्रेसिंग आहे की नाही..बऱ्याचदा आपण दुसऱ्या कडूनच सल्ला घेतो..पण आपलं आपल्याविषयी स्वतःच काही मत असते की नाही ????

मी दिसायला फारसा चांगला नाही…मी बुटकी आहे…मी अंगाने खूपच बारीक आहे…तो किती गोरा आहे..नाही तर मी..त्याला किती मस्त beard आहे…त्याच्या कडे फॅशन करायला पैसे आहेत.. त्याची personality पण किती मस्त आहे..रोज जिम ला जातो तो..मला सुद्धा जिम ला जायला पाहिजे..तो महागातली हेअरस्टाईल करतो..त्याच्या कडे बाईक आहे..ती कशी मस्त style चे कपडे वापरते.. ड्रेस वर matching सगळं घालते..ती किती स्लिम आहे..मीच का एवढी लठ्ठ..ती पार्लर मध्ये किती खर्च करते..महागडे perfumes  वापरते…माझ्याच चेहऱ्यावर पिंपल्स आहेत..तो किंवा ती करते म्हणून आपण सुद्धा ते केलंच पाहिजे…

रंग, कपडे, उंची, वजन, पैसे….अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण नेहमी स्वतःला दुसऱ्या बरोबर compare करतो. आपलं भिंग नेहमी दुसऱ्या कडे काय आहे आणि आपल्या कडे काय नाही यांवरच रोखलेलं असतं. असं का होतं?? कारण आपली कमतरता आपण जाणूनच घेत नाही..तिचा विचार न करता आपण आपल्या नशिबाला दोष देऊन मोकळे होतो..

आपल्याला आपल्या दिसण्याबाबत आत्मविश्वास येत नाही कारण आपण नेहमी आपली तुलना इतरांशीच करत असतो..दुसऱ्यापेक्षा आपण कुठे कमी आहोत हेच बघत असतो. पण मी आता अमक्याच्याच घरी जन्माला आलो आणि माझी परिस्थितीच तशी आहे  इथपासूनच का सुरू करायचं रडगाणं?? आपल्याला समोरचा जसा दिसतो तसा दिसण्यासाठी त्यानेसुद्धा खूप कष्ट घेतलेले असू शकतात.पण आपल्याला मात्र फक्त end product च दिसतं.. तुलनेनेच आपण दुःखी होतो.

फोटो मध्ये आपण अमुकच अँगलमध्ये छान दिसतो..हसल्यावर आपले दात दिसतात म्हणून मग फोटोसाठी उभं राहिलं कि दात न दिसू देण्याची काळजी आपण घ्यायला लागतो. सेल्फी काढताना याच अँगल मध्ये आपण बरे दिसतो अस आपण स्वतःच ठरवून टाकतो.. आणि मग सगळे फोटो तिरपे तिरपे…

स्वतःला कमी लेखणं आणि स्वतः मध्ये काही तरी कमी आहे असं वाटणं यात खूप फरक आहे. काही तरी कमी आहे असं वाटलं तर ती कमी आपल्याला भरून काढता येते.पण जर आपण आपल्याला इतरांपेक्षा कमी समजत राहिलो तर मग ती कमतरता अजूनच वाढत जाते..

दिसण्याविषयीचा किंवा एकूणच न्यूनगंड आपण आपली सुधारणा करण्याच्या कामी आणायला हवा..न्यूनगंडातून आपण प्रेरणा घ्यायला हवी..तरच आपण स्वतः मध्ये हवा तसा बदल घडवून आणू शकतो…नुसतं आपल्याकडे हे नाही ते नाही असं बोलून स्वतःच्या नशिबाला दोष देत बसण्याने काहीही हाती लागत नाही..

3600cookie-checkन्यूनगंड  (Inferiority complex)

Related Posts

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

3 Comments

  1. आपल्या पिढीला खरंच गरज आहे हे समजून घेण्याची😁🙏🙌छानच

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories