आठवणीतला प्रवास….(भाग १)
इंजिनीरिंग कॉलेज ….म्हणजे चार वर्षात एक तरी IV गेलीच पाहिजे असा अलिखित नियमच….जेवढा उत्साह आम्हाला शाळेतल्या सहलीला जाताना असायचा तितकाच किंबहुना त्या पेक्षा जास्ती उत्साह IV बद्दल असतो. ज्यांना घरून night out मारायची परवानगी नसते त्यांच्यासाठी हे दहा दिवस म्हणजे पर्वणीच जणू…..आयुष्यभरासाठी पुरणाऱ्या अनेक गोडकटू आठवणी या दहा दिवसांत आपल्याला मिळून जातात.
कुलू मनाली….नुसतं नाव जरी काढलं तरी डोळ्यासमोर उभे राहतात ते बर्फाची चादर ओढलेले उंच उंच डोंगर..वळणावळणाचे रस्ते…भारताचं मिनी स्वित्झर्लंडच जणू..आयुष्यात एकदा तरी भेट द्यावीच आणि तिकडंच निसर्गाचं अद्भुत रूप अनुभावावं असं एक अप्रतिम पर्यटनस्थळ..आणि इंजिनीरिंगच्या च्या so called IV मधलं एक ठरलेलं ठिकाण. बऱ्याच जणांच्या हातापाया पडल्यावर अगदीच रद्द व्हायच्या मार्गावर असलेल्या मनालीच्या सहलीचा मुहूर्त अखेर जुळून आला. सगळे मित्र, मैत्रिणी, त्यांचे मित्र मैत्रिणी, काही जणांबरोबर नुस्ती तोंडओळख, काही अगदी जवळचे असा सगळा गोतावळा…..
सुरुवात झाली तीच मुळी ताटातुटीने…. मग काय…ज्यांच्या बरोबर आधीपासून जमत होत त्यांची सोबत राहिली नाही आणि ज्यांच्याशी जमत नव्हतं त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागलं..अखेर मजल दरमजल करत चंदिगढला पोहोचलो. खरा प्रवास तर इथून पुढे सुरु होणार होता. चंदिगढ ते शिमला…आमच्या प्रवासातला पहिला डोंगरदऱ्यातला रस्ता.. नुसतं खिडकीतून बाहेर बघितलं तरी मनात धडकी भरायची. मध्येच गाडीने turn घेतला की हृदयात एकदम धस्स व्हायचं. या रस्त्यावर ड्राईव्ह करावं तर ते इकडच्याच लोकांनी..आपल्याला बाबा ते शक्य नाही.. कधी गाडीवरचा कंट्रोल जाऊन आपण दरीत कोसळू हेसुद्धा आपण सांगू शकत नाही. काही जणांनी तो थरार अनुभवला तर काही जण डोळे बंद करून निद्राधीन झाले होते. मला मात्र प्रवासात कधी जास्ती झोप येत नाही. माझे डोळे मात्र सताड उघडे होते. रात्रीच्या वेळी खाली मुंग्यांप्रमाणे भासणारी ती छोटी छोटी घरे, पाहताच भीती वाटेल अशा त्या खोल दऱ्या असं सर्व निसर्गाचं रूप मी डोळ्यात साठवत होतो. आणि त्यात आमचा ड्रायव्हर म्हणजे Fast and furious चा Dominic Toretto च जणू..दहा दिवस याच्या गाडीत कसे काढायचे हाच प्रश्न सगळ्यांना सतावत होता…रात्री साधारणतः एक वाजता आम्ही शिमल्याला पोहोचलो. रात्रीचा एक म्हणजे घरी असल्यावर माझी अर्धी रात्र झालेली असते.. पण IV च्या उत्साहात ती झोप कुठल्या कुठे पळून गेली होती. हवेत गारवा वाढला होता…सगळे अगदीच कुडकुडत होते..जेवून झाल्यावर सगळे कधी निद्रेच्या आधीन झाले आम्हालाही कळलं नाही..
– क्रमशः
No Comment