Feeling ________😥

untitled

 

आजचा जो विषय आहे , तो खरं तर समाजातला काही गहन प्रश्न वगैरे नाही. पण सोशल नेटवर्किंगचा आपल्यावर इतका जबरदस्त प्रभाव आहे आणि त्या मुळेच कि काय आपण आपल्या चांगल्या वाईट भावना व्यक्त करण्यासाठीसुद्धा सोशल नेटवर्किंग चा वापर करत आहोत आणि याबाबत विचार करणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे

उदाहरण द्यायचं झालंच तर गेल्याच आठवड्यात माझं एका मैत्रिणीबरोबर भांडण झालं. आता मैत्री म्हटली की भांडण हि येतातच. पण राग आलाय हे दाखवण्यासाठी तिने चक्क तिचा व्हाट्स अँप चा DP च काढून टाकला. नंतर लोकांना ( अर्थातच तिला हे मलाच दाखवून द्यायचं होतं) तिची कशी काळजी नाही ,ती कशी एकटी आहे आणि तिच्या आयुष्यातून कोणी मित्र अथवा मैत्रीण निघून गेल्यावर तिला कसा फरक पडत नाही वगैरे वगैरे  दर्शवणारी स्टेटस आणि फोटो तिने ठेवले.

हि कुठली राग दर्शवण्याची पद्धत 😅 .छोटंसं भांडण झालं तर DP काढा आणि जर मोठं भांडण झालं तर सरळ block….😳. असे केल्याने यांना नक्की कसलं उच्च कोटीचं समाधान मिळतं हेच मुळी मला समजत नाही.

कधीकधी या सगळ्या गोष्टींची मला भारी गंमत वाटते. म्हणजे बघा ना…एखादयाबरोबर भांडण झालं की करा लगेच DP काढून टाका. एकदम दर्दभरी स्टेटस ठेवा म्हणजे मग लोक तुम्हाला विचारणार ….नुसती सहानुभूती दाखवणार , तुम्ही कसे बरोबर आहेत हे सांगणार (चूक तुमची असेल तरीही)आणि मग शेवटी काय तर ज्याच्यामुळे तुम्ही DP काढलाय त्याने त्याची बाजू पटवून देण्याआधीच तो  दहा बारा जणांच्या मनामध्ये व्हिलन झालेला असतो.😅

फेसबुकने तर हे काम अजूनच सोपं केलंय. नुसतं feeling sad….😢 इतकं टाकलं कि सर्व जगाला कळलेलं असतं कि तुमचं काहीतरी बिनासलंय. मग त्यावर likes. मुलींना आणखी likes. आणि मग त्यावर मिळणारे फुकटचे सल्ले. इतकंच नाही नुसतं feeling….टाईप केलं की आपला सध्याचा मूड कसा आहे हे सिलेक्ट करण्यासाठी अनेक ऑपशन्सही येतात.

तुम्ही रागवा, रुसा.. त्या बद्दल माझा मुळीच आक्षेप नाही. पण आपला राग दाखवण्यासाठी व्हाट्स अँप , फेसबुकसारख्या कुबड्या वापरण्यापेक्षा समोरासमोर बोलून जर आपण आपले प्रॉब्लेम्स सोडवले तर प्रॉब्लेम्स लवकरही सुटतील आणि आपण ज्या व्यक्तीवर रागावलो होतो त्याच व्यक्तीनेआपला राग घालवला याचा आपल्याला आनंदही वाटेल. बघा एकदा प्रयत्न करून……
–                                                                                                                                प्रतिक प्रवीण म्हात्रे

2170cookie-checkFeeling ________😥

Related Posts

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

1 Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,225 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories