गप्प का ???? 😷😷

काल चर्चगेट स्टेशनवर घडलेली घटना..एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग..पण दाद द्यावी लागेल त्या मुलीच्या हिमतीला.. त्या  मुलीने मोठ्या हिमतीने त्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला पकडले..आणि हा सगळा प्रसंग cctv मध्ये कैद झाल्यामुळे त्या व्यक्तीला लगेच अटकही झाली..पण या घटनेनंतर पुन्हा एकदा समोर आले तेच प्रश्न…सर्वात सुरक्षित मुंबई कशी झाली असुरक्षित??? मुंबई दुसरी दिल्ली होतेय का ???इतके उपाय करूनसुद्धा महिला शेवटी असुरक्षितच ???
असं काही घडलं की मग दोन चार दिवस मीडिया हा प्रसंग उचलून धरते..काही नवीन उपाय सुद्धा योजले जातात पण काही दिवसांनंतर परिस्थिती ‘जैसे थे’.

याचमुळे असा प्रसंग जर कोणावर आला तर याच मुलीसारखी हिंमत दाखवायला हवी. कुणीतरी मदतीला येईल याची वाट न बघता त्या मुलीनेच त्या प्रसंगाला सामोरं जायला हवं. हल्लीच्या मुली आधीच्या मानाने जास्त डेअरिंगबाज झाल्या आहेत म्हणा..पोलिसांनी सुद्धा अशा घटनांवर आळा बसवण्यासाठी अनेक अँप्लिकेशन, टोल फ्री नंबर्स अशा बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत…..तरीसुद्धा असे प्रसंग येतातच..

या घटनेनंतर झालेल्या मुलाखतीमध्ये बऱ्याच मुलींनी हेच सांगितलं की त्यांना चेकआऊट केलं जात. बस मध्ये वगैरे मुद्दामून धक्का मारला जातो.
जर तुमच्या कडे कोणी रोखून बघत असेल किंवा तुम्हाला चेकआऊट करत असेल तर बघा ना बिनधास्त त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून..तुमच्या त्या नजरेने त्या व्यक्तीची नजर झुकलीच पाहिजे..झुकणारच..परत तो तुमच्याकडे बघणारसुद्धा नाही..पण बऱ्याचदा या गोष्टीकडे दुर्लक्षच केलं जातं. 

बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये काही जण मुद्दाम धक्का मारतात हे सुद्धा खरंच आहे. पण मुद्दामून मारलेला धक्का आणि चुकून लागलेला धक्का या मधला फरक सुद्धा मुलींना समजायला हवा. नाही तर बऱ्याचवेळा काही चुकी नसताना सुद्धा एखाद्याला लोकांचा मार खावा लागतो.मागच्या माझ्या एका लेखामध्ये मी हा प्रसंग सांगितला होता. बोरिवली स्टेशनवर ब्रिजवर चढताना एका जॉबला जाणाऱ्या मुलाचा एक लग्नाच्या वयात असलेल्या मुलीला चुकून धक्का लागला. तो मुलगा सॉरी बोलून पुढे चालू लागला. हा धक्का चुकून लागला हे त्या मुलीलासुद्धा कळलं असावं. पण त्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलाला पकडलं आणि त्याच्या दोन कानाखाली लगावून दिल्या आणि आश्चर्य म्हणजे तेव्हा ती मुलगी एकदम मौन..तिने तोंडातून एक चकार शब्द सुद्धा काढला नाही आणि त्यामुळेच त्या मुलाला लोकांचा मार खावा लागला. अर्थात त्या लोकांमध्ये काय घडलंय हे माहीत नसलेले लोक सुद्धा होतेच…

सांगायचा मुद्दा एवढाच की तुम्ही परिस्थिती ओळखून त्याप्रमाणे वागायला हवं..तरच तुमच्यावर होणारे अन्याय कमी होऊ शकतात. नुसतं गप्प बसून आणि निषेध करून हाती काहीही लागणार नाहीये..

 

                                               – प्रतिक प्रवीण म्हात्रे

4190cookie-checkगप्प का ???? 😷😷

Related Posts

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 121,012 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories