लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…

marathi-bhasha-diwas-710x360

एखादा दिवस साजरा करणं आजकाल किती सोपं होत चाललं आहे! सगळ्यांनी एकत्र मिळून थोडाफार दंगा केला, मोठ्या आवाजात गाणी लावली कि झालाच तो दिवस साजरा..उद्या २७ फेब्रुवारी…जागतिक मराठी भाषा दिवस…संपूर्ण जगभरातील मराठी भाषिक हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून प्रयत्न करतोय का ? आपल्या दैनंदिन जीवनात मराठीला योग्य दर्जा आपण देतोय का ? राज्यभाषा म्हणुन मान्यता प्राप्त झालेल्या आपल्या मराठी भाषेला आपण योग्य तो न्याय देतोय का ?

आपली भाषा- आपली मातृभाषा हीसुद्धा जागतिक भाषेच्या रेटय़ासमोर- प्रसारमाध्यमांच्या प्रभावाद्वारे तिच्या हक्कांपासून वंचित होते आहे. आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत. भाषेच्या शुद्धतेला आपण पारखे होत आहोत. एकीकडे इंग्रजीसारख्या भाषेचा द्वेष तर करायचा नाहीच; किंबहुना त्याचे ज्ञानही मिळवायचे हे आव्हान आहेच.. त्याचबरोबरीने आपली भाषा समृद्ध करायची, तिचा वापर-प्रसार करायचा आणि तिचे चिरंतनत्व अबाधित राखायचे हेसुद्धा मोठे आव्हान आहे.

मराठी भाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या साधारणतः  ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. याउलट मराठी आणि काही अन्य भारतीय भाषांच्यावर संस्कार होऊन संस्कृत भाषा बनली असेही काही विद्वान मानतात. जर इतका प्राचीन वारसा आपल्या मराठी भाषेला लाभला आहे तर मग तो वारसा टिकवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायला हवे . तुम्ही कधी  दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेलात तर तुम्हाला असं दिसेल कि त्या राज्यातली लोक हे त्यांच्याच भाषेत आपल्याशी बोलतात.. मग ती आपल्याला समजो वा न समजो… हिंदीचा वापर ते अगदीच कमी करतात. आणि आपण काय करतो…समोरच्याला आपली मराठी भाषा समजली नाही..तर मग लगेच हिंदीत बोलायला सुरुवात…अरे कशाला ?? शिकू दे कि त्यांना पण जरा मराठी.  हल्ली तर दोन मराठी माणसं एकत्र आली तरी हिंदी किंवा इंग्रजीमध्येच बोलतात. का?? मराठीत बोलण्याची लाज वाटते?? जर आपणच आपली भाषा बोलणं सोडून दिलं तर मग इतर लोकांकडून काय अपेक्षा करणार…..

हल्ली अमेरिकेत असलेले मराठी भाषिक सुद्धा आपल्या मुलांना मराठी भाषा यावी म्हणून त्यांना अमेरिकेमध्ये मराठी भाषेच्या शिकवण्या लावतात..आणि इकडे महाराष्ट्रातच आपण मराठीमध्ये बोलायला लाजतो.तुम्ही मराठी माध्यमांमधून शिक्षण घ्या किंवा इंग्रजी माध्यमांमधून…आपली मातृभाषा तर तुम्हाला यायला हवीच..इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या किती तरी जणांना साधं मराठी वाचताही येत नाही ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे…

जेव्हा सरकारी कार्यालयात आपलं काही काम असलं तेव्हा बोलतोच ना आपण मराठीत.. का?? कारण मराठी माणसाशी मराठीत बोलल्यावर आपलं काम लवकर होतं..मग इतर वेळी आपण मराठीत का बोलू नये…लोकलमध्ये जर कोणासोबत भांडण झालं तर बोलून बघा एकदा मराठीत….जर तो परप्रांतीय असेल पण पुन्हा त्याच्या बापाची सुद्धा हिम्मत होणार नाही तुमच्याशी नडायची..पण आपली समस्या अशी आहे की आपण मराठीत बोलायलाच बघत नाही…जिकडे बघावं तिकडे नुसतं हिंदी आणि इंग्रजी..जर आपल्यालाच आपल्या मातृभाषेचा अभिमान नाही तर आपल्या पुढच्या पिढीला तरी तो कसा असणार…

आता मराठी भाषेने कात टाकली आहे…फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात उंच झेप घेतली आहे. आणि या प्रवासात आपण तिला सोबत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे..आणि ते आपण सर्वांनी पार पाडायलाच हवं…तुम्ही हिंदीत बोला, इंग्रजीत बोला…पण जेव्हा शक्य आहे तेव्हा मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करा…तेराशे वर्षांची परंपरा लाभलेल्या, देशात चौथ्या आणि जगात एकोणिसाव्या स्थानावर असलेल्या आपल्या या मराठी भाषेचा अभिमान बाळगा…. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राचं मराठीपण जपा….

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी |
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी ||

धन्यवाद !!!
_                                                                                      प्रतिक प्रवीण म्हात्रे

2860cookie-checkलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…

Related Posts

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

2 Comments

  1. खूप सुंदर प्रतिक👌👌👌सोप्या शब्दात खूप काही सांगून गेलास..

Leave a Reply

Blog Stats

  • 123,226 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories