Friend कि Best friend…..

y

मैत्री.…..

या विषयावर अनेक मोठमोठया लोकांनी आपापले विचार मांडले आहेत.मी अजून काय बोलणार…

       आपल्याला अनेक मित्रमैत्रिणी असतात. School friends, college friends, class चे friends आणि आता तर फेसबुक आणि Instagram वरचे friends सुद्धा…फेसबुक Instagram वरच्या कित्येक जणांना तर आपण ओळखत सुद्धा नसतो.

मागच्याच महिन्यातली एक गंमत सांगतो. माझी एक मैत्रीण तिच्या नातेवाईकांकडे एका समारंभाला गेली होती.तिथे कोणी तरी तिला पाहिलं आणि त्याच्या मित्रांना सांगितलं की अरे हि बघ…….तिने ते ऐकलं आणि ती एकदम विचारातच पडली.कि या मुलाला मी कधी साधं बघितलंही नाहीये आणि याला माझं नाव कसं काय माहित . आपल्या फेसबुक च्या अकाउंट मध्ये कोण कोण आहे याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते..काय करणार….काळानुसार मैत्रीची व्याख्यासुद्धाच बदलत चाललीये ना…

अशा आपल्या अनेक friends पैकी काही जणांना आपण आपलं best friend मानतो. पण  best friend म्हणजे काय हेच मुळी मला अजून समजलेलं नाहीये. एखाद्याशी आपलं खूप छान जमतं, त्याच्याशी आपण आपल्या मनातलं शेअर करू शकतो, आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये तो नेहमी आपल्या बरोबर आहे असा विश्वास आपल्याला असतो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याच्या बद्दल आपल्या घरी सर्व काही माहित असतं…मग अशा व्यक्तीला आपण आपलं best friend समजू लागतो. पण मुळात आपण आपल्या friends मध्ये असा भेदभाव का करतो. हा माझा friend…आणि हा माझा Bestie… कशाला?? तुमच्या Bestie च्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटतात का? कालचाच एक किस्सा सांगतो. दोन मैत्रिणी.. अगदी जीव भावाच्या..जर समलैंगिक संबंधांना समाजाने परवानगी दिली तर लग्नसुद्धा करतील 😅😅 इतक्या…नेहमी  एकमेकांचा विचार करणाऱ्या..काल काही तरी कारणांवरून त्या दोघींमध्ये भांडण झालं..दिवस मावळायच्या आत ते भांडण मिटलं हि गोष्ट वेगळी.. या वरून मला एवढंच सांगायचं आहे की best friends मध्ये सुद्धा भांडण होतातच..मग उगाच हा भेदभाव कशाला… तुमचे सगळेच friends तुमचे best friends बनू शकत नाही का..

     मान्य आहे…कि काही व्यक्ती आपल्यासाठी खूप special असतात. ज्यांच्याशी आपण एक दिवस जरी बोललो नाही तरी आपल्याला करमत नाही. त्यांची मर्जी सांभाळायचा आपण नेहमी प्रयत्न करतो.  मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे ते एक सुंदर नातं असतं.

पण ही गोष्ट सोडली तर मोजक्या काही लोकांना आपलं Bestie मानण्यापेक्षा जर आपण आपल्या सगळ्याचं friends ला आपलं best friend मानलं तर आपला काही तोटा होणार आहे का??

शेवटी मैत्री हि मैत्री असते…प्रेमापेक्षाही सुंदर असं ते एक नातं असतं. तिला असं Categorized करण्याचा प्रयत्न न केलेलाच बरा…..

                                                                                                                                      प्रतिक प्रवीण म्हात्रे

2710cookie-checkFriend कि Best friend…..

Related Posts

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

1 Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 116,979 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories