
Uncategorized
वर्क फ्रॉम होम 💻🏠
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच
माजलं कोरोनाचं प्रचंड स्तोम
सरकारने काढलं फर्मान आणि
कंपन्यांनी दिलं वर्क फ्रॉम होम
मनातील सुप्त इच्छापूर्तीचा
आनंद गगनात मावेनासा झाला
सोबत घेऊन सिस्टिम आणि लॅपटॉप
कर्मचारी घरी रवाना झाला
नव्याचे नऊ दिवस तसं
वर्क फ्रॉम होम आवडू लागलं
ट्रेन, ट्रॅफिक ह्यापासून सुटका झाली म्हणून
मनाला एकदम हायसं वाटलं
काही काळ गेल्यावर मात्र
वास्तवाचं भयानक स्वरूप दिसलं
नऊ तास वगैरे सगळं मागे पडून
कामाचं प्रेशर मात्र वाढतच राहिलं
एकाच जागीच बसून राहिल्याने
हालचाल अचानक बंद झाली
व्यायामाने दूर गेलेली जुनी दुखणी
पुन्हा एकदा वर आली
विकेंड वगैरे संकल्पना
फक्त मनातच शिल्लक राहिली
कुटुंबाशी जवळीक वाढण्याऐवजी
काँप्युटरच्या स्क्रिनशीच मैत्री झाली
No Comment