Men’s Day

उपमा मिळते फणसाची त्याला
समजणं त्याला आहे जरा अवघड
असला जरी कितीही प्रेमळ
इतरांना मात्र नेहमीच वाटतो दगड

वेळप्रसंगी तो ही खचतो
पण जाणवू देत नाही कधी
रडू त्यालाही येतं
पण आसवं गाळत नाही कधी

पडला जरी तो एकाकी
करतो संकटांशी दोन हात
असेनात कितीही अडचणी समोर
तो जिद्दीने त्यावर करतो मात

का असतो तो नेहमी त्रस्त
केलाय का कधी विचार
सांभाळतो तो डोलारा सारा
बनून कुटुंबाचा आधार

© PRATILIKHIT

9570cookie-checkMen’s Day

Related Posts

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

जगण्यात मौज आहे…

जगण्यात मौज आहे…

ओळख

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 114,924 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories