Site icon PRATILIKHIT

26/11

Advertisements

निजलेली मुंबई शांत
डाव साधला गनिमांनी
रक्षणकर्ता सागरच झाला फितूर
अन ओंजळ भरली जखमांनी

मुंबईची सुंदरता ओरबाडण्याची
योजना त्यांनी आखली
रेल्वे स्थानकांसोबतच इस्पितळेही
सामान्यांच्या रक्ताने माखली

जवानांसोबतच मुंबई पोलिसांनी
केली पराक्रमाची शर्थ
सद्रक्षणाय खलनिग्रहणायचा
जगाला समजावून सांगितला अर्थ

येतील अशी अनेक संकटे
पण मुंबई कधी हरणार नाही
राखेतून पुन्हा उभी राहील ती
पण गनिमांसमोर कधीच झुकणार नाही

©PRATILIKHIT

20350cookie-check26/11
Exit mobile version