Site icon PRATILIKHIT

रम्य ते बालपण

Advertisements

बदलणाऱ्या काळासोबत बालपणाची
व्याख्याच पार बदलून गेली
लहानपण देगा देवा ही
केवळ एक संकल्पनाच झाली

अभ्यासापेक्षा प्रिय आम्हाला
होते मैदानावरचेच खेळ
शाळा आणि क्लाससोबत
साधावा लागायचा मेळ

मे महिन्याची सुट्टी म्हणजे
आमच्यासाठी असायची पर्वणी
कधी लपाछपी चोरपोलीस
तर कधी डोंगर का पाणी

हल्ली मुलांच्या हातात
फक्त रिमोट आणि स्मार्टफोन
जीवनाकडे पाहण्याचा
बदलून गेलाय दृष्टिकोन

जे बालपण आम्ही अनुभवलं
ते आत्ताच्या पिढीला मिळेल का
हातून निसटून गेलेले क्षण
पुन्हा जगायला मिळतील का

©PRATILIKHIT

21340cookie-checkरम्य ते बालपण
Exit mobile version