Site icon PRATILIKHIT

तो मात्र पाहतच राहिला…

Advertisements

हातातली छत्री बाजूला सारून ती
पावसाचे थेंब तळहातावर झेलत होती
भान हरपून मनसोक्त नाचत असताना
तो मात्र पाहतच राहिला

बऱ्याच प्रयत्नानंतर भेट घडली
कधी नव्हते ती पुण्याई फळली
टिटवीसारखी अखंड बडबड करत असताना
तो मात्र पाहतच राहिला

नात्याचे ऋतू बदलत होते
गनिमांचे डाव अधिकच रंगत होते
तिला दुसऱ्याचा हात धरून जाताना
तो मात्र पाहतच राहिला

मन सागराकडे धाव घेत होतं
त्याच्या लाटांवर स्वैर होऊ पाहत होतं
पण क्षण वाळूसारखे हातून निसटत असताना
तो मात्र फक्त पाहतच राहिला

©PRATILIKHIT

11740cookie-checkतो मात्र पाहतच राहिला…
Exit mobile version