Site icon PRATILIKHIT

जिंदगी

Advertisements

जिद्द असतेच बदल घडवण्याची
अन अनोळख्या भीतीची असते साथ
आपलीच माणसं पाय खेचतात
तर कधी अतिविचारही करतो घात

प्रवाहाविरुद्ध पोहताना
सगळीकडूनच होतो विरोध
पोहत राहायचं दुर्लक्ष करून
अन करायचा नाही क्रोध

कष्ट वगैरेला विचारतच नाही कुणी
इथे निकालाचाच केला जातो स्वीकार
रितच आहे ही या जगाची
इथे केवळ उगवत्यालाच नमस्कार

जिद्दीला द्यावी प्रयत्नांची जोड
अन सोडावं विचारांना मुक्त
कारण काय चाललंय आपल्या आयुष्यात
हे आपल्यालाच माहीत असतं फक्त

©प्रतिलिखित

23990cookie-checkजिंदगी
Exit mobile version