Site icon PRATILIKHIT

लहानपण देगा देवा . . . .

Advertisements

 

देवा मला पुन्हा एकदा लहान व्हायचयं
ओल्या मातीत खुप खुप खेळायचयं
कोणी ओरडल तर मुद्दाम रडायचयं
टब मध्ये आंघोळीसाठी हट्ट करायचय
देवा मला पुन्हा एकदा लहान व्हायचयं

चॉकलेट मिळण्यासाठी खोट खोट रडायचय
ते मिळाल्याच्या आनंदात हसायचय
पुन्हा एकदा मला शाळेत जायचय
देवा मला पुन्हा एकदा लहान व्हायचयं

शेवटच्या बेंच साठी पुन्हा एकदा भांडायचय
पुन्हा एकदा मला डब्बा वाटून खायचाय
लेक्चर्स बंक करुन मला प्रॅक्टीस साठी पळायचय
देवा मला पुन्हा एकदा लहान व्हायचयं

मित्राला त्याला आवडणाऱ्या मुलीच्या नावाने चिड़वायच
मला आवडणाऱ्या मुलीकडे चोरून बघायचय
पुन्हा मला रोज मधल्या सुट्टीची वाट बघायचिये
देवा मला पुन्हा एकदा लहान व्हायचयं

पुन्हा मला ट्रेन मधून प्रवास करायचय
धावणाऱ्या झाडांकडे मला कुतुहलाने बघायचय
प्रश्न विचारुन बाबांना भंडावून सोडायचय
देवा मला पुन्हा एकदा लहान व्हायचयं

–  प्रतिक प्रवीण म्हात्रे

170cookie-checkलहानपण देगा देवा . . . .
Exit mobile version