
Uncategorized
देशप्रेम
ह्या वर्षी पुन्हा एकदा
ऑगस्ट महिन्याची पंधरा तारिख येईल
पुन्हा एकदा भारतीयांच्या मनात
दबून राहिलेलं देशप्रेम जागं होईल
इतर दिवशी कुठे हो आम्हाला
आमच्या देशाची चिंता
निवडून दिलाय ना लोकनेता
मग तोच देशाचा पोशिंदा
घडतायेत आमच्याच नजरेसमोर गुन्हे
पण आम्हाला काय करायचंय
पोलीस बघून घेतील ना सारं
आम्हाला फक्त स्टेटस टाकायचंय
प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनीच
काय ते आमचं देशावरचं प्रेम
बाजारात विकत मिळतो ना तिरंगा
अन विकल्या जातात क्रांतिकारकांच्या फ्रेम
ह्या महान देशाचा नागरिक म्हणून
माझं कर्तव्य मला पार पाडायचंय
स्वतःला भारतीय असं अभिमानाने म्हणवून
थोडंस ह्या देशाबद्दल जाणून घ्यायचंय
©प्रतिलिखित
No Comment