
Uncategorized
लोक काय म्हणतील??
लोक काय म्हणतील???
पाऊल ठेवताच चौकटीबाहेर
अनेक अडचणी उभ्या ठाकतील
घरच्यांना मात्र एकच भीती
पण लोक काय म्हणतील??
का विचारात घ्यावी लोकांची मते
अन स्वतःचा आनंद लाथाडावा
आपलं मन मारून
अनोळखी लोकांचा विचार करावा
आपल्या आयुष्याचे निर्णय
का त्यांच्या मतानुसार घ्यावे
स्वतःच्या मनाचं न ऐकता
दुसऱ्यांना अधिक महत्व द्यावे
वाईट करताना ठेवावि लाज
करावा तेव्हा लोकांचा विचार
चांगले करताना ऐकावे मनाचे
अन स्वच्छ ठेवावे आपले आचार
©PRATILIKHIT
No Comment