
Uncategorized
ती
तशी ती सर्वांनाच प्रिय
पण मला थोडी जास्त आवडते
कारण कुणी असो नसो
ती नेहमीच सोबत असते
कामामुळे आमची भेट
घरी परत आल्यावरच होते
तिला भेटताच चेहऱ्यावर
नकळत हास्य उमटते
कधीतरी वेबसीरिजच्या नादात
तिच्याकडे दुर्लक्ष होते
ती मात्र न रागावता
नेहमीच माझी वाट पाहते
तिच्या कुशीत शिरल्यावर
जरा डोकं शांत होतं
दिवसभराचा थकवा जाऊन
पुन्हा मन प्रफुल्लित होतं
सोडून सुटकेचा निःश्वास
मी आधीन तिच्या होतो
दूर सरतात सर्व व्यथा चिंता
अन स्वर्गसुखाचा अनुभव होतो
तीच, आपली लाडकी झोप.
© PRATILIKHIT
No Comment