Uncategorized
धोनी- रैना
सलामीवीरांच्या झटपट बाद होण्याने
भारतीय संघाची व्हायची दैना
मग खिंड लढवायला यायचा धोनी
आणि सोबतीला असायचा रैना
मधल्या फळीतील फलंदाज दोघे
एक आक्रमक दुसरा तेवढाच कुल
पण शेवटची काही षटक राहिली
की धोनीही पेटून उठायचा फुल
क्षेत्ररक्षणात तर दोघेही तरबेज
नयनरम्य असायचा देखावा
एकाने डाईव्ह मारून बॉल अडवावा
तर दुसऱ्याने अलगद यष्टीमागे झेलावा
दोघेही एकत्रच झाले निवृत्त
ना कुठलीही परिषद ना कोणताही गाजावाजा
पण क्रिकेटरसिकांना नेहमीच लक्षात राहील
सगळं सगळं जिंकून दिलेला राजा
© PRATILIKHIT
No Comment