
Uncategorized
कृष्ण
जाहला आदेश आकाशवणीचा
पोहोचविण्या जगन्नाथा नंदाघरी
तुटल्या बेड्या उघडली द्वारे
अन पावसात निघे वसुदेवाची स्वारी
गोकुळात राहिला हरी
दह्या दुधाने माखला
करण्या गर्वहरण देवराजाचे
गोवर्धन करंगळीवरी तोलला
दाविल्या अनेक लीला
तरीही लोक म्हणती छलिया
घेऊनी झेप यमुनेत तू
पळवून लाविले कालिया
म्लेंच्छमुक्त करण्या मथुरा
आले श्रीकृष्ण बलरामासवे अक्रूर
वधिले मामा कंसास
अन लोळविले मुष्टिक चाणूर
काया कठोर वज्रासम परी
सुकुमार म्हणुनी प्रसिध्द तू
करविता महाभारताचा असूनही
रणछोड म्हणुनी बदनाम तू
© PRATILIKHIT
No Comment