Uncategorized
विठ्ठल
चाहूल लागता आषाढाची
उत्सव एकादशीचा घरोघरी
घेऊनी पादुका साधुसंतांच्या
निघे नटुनि लालपरी
ओढ लागुनी माऊलीची
वेगात वाहे चंद्रभागा
जणू घाई तिजला पोहोचण्याची
करण्या अभिषेक पांडुरंगा
जरी येणे झाले नाही
राग मानून घेऊ नकोस
आम्हावर असलेली कृपादृष्टी
कमी होऊ देऊ नकोस
वारून ने ही संकटे सारी
दाखव पुन्हा तू चमत्कार
आलो शरण तुजपाशी
दूर सारूनी अहंकार
© PRATILIKHIT
No Comment