Site icon PRATILIKHIT

बाप माणूस

Advertisements

सोपं नसतं हो
कुटुंबाचा बाप होणं
चेहऱ्यावर हास्य ठेवून
परिस्थितीचं ओझं वाहणं

असतात असंख्य विचार मनात
काळीज पोखरते कुटुंबाची काळजी
लढत असतो एकटा संकटांशी तो
होऊन पावनखिंडीतील बाजी

गरजा पूर्ण करण्यातच
आयुष्य त्याचे सरते
कधी लाईट फोनची बिले
तर कधी होमलोनचे हप्ते

आयुष्य मुलांसाठी झिजवूनसुद्धा
कोरीच त्याच्या नशिबाची डायरी
म्हणून तर पाहावी लागते त्याला
कधीतरी त्या वृद्धाश्रमाची पायरी

मोठ्या अभिमानाने म्हणतो आपण
बाप हा बाप असतो
कारण आई जरी प्रेमाचं प्रतीक असली
तर बाप हा सर्वोच्चतेचं प्रमाण असतो

© PRATILIKHIT

13570cookie-checkबाप माणूस
Exit mobile version