
Uncategorized
स्वातंत्र्यवीर सावरकर
तोडण्या पारतंत्र्याच्या बेड्या
निश्चय करुनी ठाम
ठेविले तुळशीपत्र घरदारी
लढण्या भारत स्वतंत्रसंग्राम
कठीण समय तो मोठा
प्लेग असह्य जाहला होता
रँड वधाच्या आरोपाने
चापेकरांवर खटला होता
वापर करावा स्वदेशीचा
पहिलं आवाहन त्याच वेळी
पेटविली विदेशी वस्त्रे
अन केली त्यांची होळी
अंगी चिकाटी मनी मातृभूमी
मग कशी जखडेल ती बेडी
अशक्य ते शक्य करुनी
मारली भर समुद्रात उडी
आयुष्य वेचले देशासाठी
परी कधी ना ठेवली अपेक्षा
ब्रिटिश तर परकेच होते
आपुल्या सरकारनेही दिली शिक्षा
झेलल्या अनेक हालअपेष्टा
सोलून काढला कोलू
भेट द्या कधी अंदमानला
कारागृहही लागतो बोलू
©PRATILIKHIT
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻
No Comment