Uncategorized
ओळख
ओळख तशी जुनीच आमची
पण ओळखायला मी चुकत होतो
नवीन फुलणाऱ्या त्या नात्याला
उगाच जास्त महत्व देत होतो
तिच्या एका फोनची
मी आतुरतेने वाट पाहायचो
पोराच्या काळजीने फोन करणाऱ्या
आईलाही होल्ड वर ठेवायचो
सतत तिचा विषय म्हणून
मित्रांशी सुद्धा भांडण व्हायचं
जळतात रे सगळे तुझ्यावर
तिचं हेच म्हणणं असायचं
काय चूक काय बरोबर
हे कळण्यास उशीर झाला
मी थोडा लांब होताच
तिच्या आयुष्यात दुसरा आला
भविष्याचा विचार करून
मी स्वतःमध्ये गुंतून गेलो
तांदळातल्या खड्यागत
हलकेच बाहेर फेकला गेलो
© PRATILIKHIT
(वरील कविता पूर्णपणे काल्पनिक असून तिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. )
No Comment