Site icon PRATILIKHIT

प्रवाहाबरोबर पोहताना

Advertisements

प्रवाहाबरोबर पोहताना
स्वप्ने मागे राहायची
हरवणार तर नाही ना
भीती सारखी वाटायची

परिस्थितीचा न्यूनगंड
सतत जपत राहायचो
इतरांशी तुलना करून
स्वतःलाच कमी लेखायचो

लोक काय म्हणतील हा
प्रश्न सारखा पडायचा
आसपासच्या लोकांचा दुटप्पीपणाच
त्याचे उत्तर देऊन जायचा

निर्णय ठाम असताना
का इतरांसाठी तो बदलावा
न लढता हार मारून
का नशिबाला दोष द्यावा

© PRATILIKHIT

11620cookie-checkप्रवाहाबरोबर पोहताना
Exit mobile version