एका दिवसाचं प्रेम

नेहमीप्रमाणे कट्ट्यावर बसलो होतो
झाली एकचं नजरानजर
हृदयात वाजली घंटी
आणि पुन्हा प्रेमाचा फुटला पाझर

वर्गात जाऊन पाहतो तर
पहिल्या रांगेतच ती होती
नेहमी रिकाम्या असलेल्या बाकांवर
आज मात्र गर्दी होती

सुरुवात कशी करावी
स्वतःलाच प्रश्न पडत होते
एरवी सावकाश चालणारे घड्याळाचे काटे
आज मात्र पळत होते

अर्धा दिवस उलटला तरी
हिंमत माझी होत नव्हती
तिने नाही पाहिलं तरी
नजर माझी हटत नव्हती

घरी जाते वेळी स्वतःशीच म्हटलं
डर के आगे जीत हैं
हसून बोलली तर ठीक
नही तो हम वैसे भी सिंगल हैं

ओळख करून घेण्यासाठी
मी हात पुढे केला
भावा म्हणून हाक मारून
तिने माझा घात केला

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

6770cookie-checkएका दिवसाचं प्रेम

Related Posts

Engineer

Engineer

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

जगण्यात मौज आहे…

जगण्यात मौज आहे…

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 121,012 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories