जाऊ दे ना…आपल्याला काय करायचंय..

‘जाऊ दे ना…आपल्याला काय करायचंय..’
किती सहज बोलून जातो आपण . अगदी मागचा पुढचा काहीही विचार न करता.

आता हेच बघा ना..रस्त्यावरून जाताना आपल्याला कोणाचा तरी अपघात झालेला दिसतो. एक उत्सुकता म्हणून आपण त्या ठिकाणी जरा डोकावून बघतो. पण आपल्या ओळखीचं कोणी नसेल तर अगदी सहज आपल्या मनात येतं..’जाऊ दे ना..आपल्याला काय करायचंय…’ आत्यंतिक वेदनेने ओरडणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल थोडीशी सहानभूती दाखवण्यापलीकडे आपण काहीही करत नाही. पण जेव्हा हीच परिस्थिती आपल्यावर किंवा आपल्या आप्तेष्टांवर येते तेव्हा आपण इतरांकडून मदतीची अपेक्षा करतो आणि आपला अपेक्षाभंग झाला की मग माणुसकी वगैरे असे जड जड शब्द वापरतो.

एखादा अनोळखी माणूस साधारण चारपाच वर्षे वय असलेल्या मुलाला..ज्याला अजून चांगलं आणि वाईट यातला फरक सुद्धा कळत नाही ….त्याला चॉकोलेट किंवा आईस्क्रीमचं आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या लहान मुलासाठी ती व्यक्ती अगदीच अनोळखी आहे आणि ती त्याची खोटी समजूत घालायचा प्रयत्न करतेय हे समजून सुद्धा आपण दुर्लक्ष करतो. आणि आपल्या आशा दुर्लक्ष करण्यामुळेच लहान मुलांच्या अपहरणाच प्रमाण वाढलय. अर्थात त्या मुलाला सांभाळणं, त्याची काळजी घेणं हे त्यांच्या आई वडिलांचंच कर्तव्य आहे पण त्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात कसला शहाणपणा ना…आपण थोडीशी जागरूकता दाखवली तर अशा गोष्टींवर आळा बसायला मदत होणार नाही का??

आपल्या समोर एखाद्या मुलीची छेड काढली जाते..तिच्यासोबत असभ्य वर्तणूक केली जाते…आणि आपण बघून सुद्धा न बघितल्यासारखं करतो. अर्थात आपल्याला आपल्या जीवाची चिंता असते म्हणा..या सगळ्या भानगडीत आपल्या जीवाला धोका पोहोचू नये असा विचार करून आपण गप्प बसतो. आणि आपल्याला आपल्या घरुनसुद्धा तेच सांगितलेलं असतं. पण हल्ली आजूबाजूला कितीतरी पोलीस, सुरक्षारक्षक असतात..आपण ही बाब त्यांच्या निदर्शनास जरी आणून दिली तरी पुढचं काम ते करतील. म्हणजे तशी अपेक्षा तरी आपण करूच शकतो. पण आपण हाच विचार करतो..’ जाऊ दे ना..तिचं ती बघून घेईल..आपल्याला काय करायचं??’ पण हाच प्रसंग जेव्हा आपल्या बहिणीवर येतो तेव्हा आपण पब्लिक ला दोष देऊन मोकळे होतो.

असे एक नाही तर अनेक प्रसंग आपल्या समोर घडत असतात आणि आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतो. नेहमीच आपण मदत करू शकतो असं नाही पण फक्त ती व्यक्ती आपल्याशी संबंधित नाही म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करून आपण कृतघ्न होत नाही का…वेळ ही काही सांगून येत नाही…उद्या कदाचित त्या व्यक्तीच्या जागी आपणसुद्धा असू शकतो. त्यामुळे जेव्हा शक्य आहे तेव्हा मदत करायला काय हरकत आहे..

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

5950cookie-checkजाऊ दे ना…आपल्याला काय करायचंय..

Related Posts

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

6 Comments

  1. Kharach,khup horrible ahe he sarv je ghadatay..I just hope tuzya ya lekh mule change ghadun yeil.👍👍👌👌☺

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories