नियती……(भाग ५)
सगळे घरी गेले तरी रश्मी आणि अविनाश कामच करत होते..त्यांच्या आवडीचं काम ते…वेळ कसा जातोय त्यांचं त्यांनाही कळत नव्हतं..रश्मी सुरभीने मेल केलेल्या आधीच्या इव्हेंटचा रिपोर्ट स्टडी करत होती आणि अविनाश त्या इव्हेंट साठी योग्य असं लोकेशन शोधत होता…त्यांनी बऱ्याच ठिकाणी फोनसुद्धा केला पण ज्या दिवशीचं बुकिंग हवं होतं त्या दिवशीच मिळत नव्हतं…
“रश्मी…..”
“हं…… बोल ना….”
“अगं २२ तारखेला कोणता चांगला हॉल नाही मिळत आहे…”
” अरे असं कसं होईल….एवढे हॉल आहेत मुंबई मध्ये….जरा अजून प्रयत्न करू….सापडेल…एवढा अनुभवी ना तू….मग लगेच काय पॅनिक होतोय….”
” पॅनिक नाही होत आहे गं…..मी माझ्या कॉन्टॅक्ट मधल्या जवळपास सगळ्या लोकांना कॉल करून विचारलं पण त्यांचे हॉल आधीच booked आहेत…”
“अच्छा….काही काळजी करू नकोस….. मी पण माझ्या ओळखीचे आहेत त्यांच्याशी बोलून बघते….”
” आता निघुया आपण….उद्या बघूया काय ते…..”
” बरं…..”
” कॉफी प्यायची इच्छा झालीये मला…..CCD ला जाऊया…..”
” आत्ता?????”
“हो……”
” उममम…. चालेल….पण नंतर तुला मला बस स्टॉप पर्यंत सोडावं लागेल..कारण CCD च्या इथून बस नाही मिळत….”
” बस स्टॉप पर्यंत कशाला…..त्या दिवशी सोडलं तसं सोडेन ना घरी….ऑन द वे च तर आहे…अर्थात तुला काही प्रॉब्लेम नसेल तर….”
“मला काय प्रॉब्लेम असणार आहे….मला उलटं चांगलंच आहे….आमच्या एरिया मधला एक जण नेहमी माझ्याकडे टक लावून बघत असतो…..अशी एक कानाखाली वाजवावीशी वाटते….तूला एकदा दोनदा बघितलं तर त्याला वाटेल की तू माझा बॉयफ्रेंड आहे….बघ माझा पिच्छा सोडून देईल….”
” ओह….म्हणजे आता स्वतःच्या फायद्यासाठी तू माझा वापर करणार तर…” अविनाश हसत म्हणाला.
” वापर वगैरे नाही रे….आता तू सोडायला येशील तर अनायसेच माझं काम सोपं होईल ना…”
” ते पण आहे….बरं चल… निघुया आता….”
अविनाशने रश्मीला गेटच्या बाहेर उभं राहायला सांगितलं आणि तो पार्किंग मध्ये बाईक आणायला गेला…..त्या दिवशी पहिल्यांदाच तिने त्याच्या बाईककडे निरखून बघितलं…बाईक घेऊन जवळपास दोन तीन महिने झाले असतील तर एकदम काल घेतल्यासारखी वाटत होती…एकदम स्वच्छ….अजिबात आवाज नाही काही नाही..बाईक बघूनतरी अविनाशचं त्या बाईकवर किती प्रेम आहे हे कोणीही सांगितलं असतं…पण बोलायला काहीतरी विषय हवा म्हणून तिने त्याला विचारलं…
” अविनाश….तुला बाईक चालवायला खूप आवडतं वाटतं….”
” वाटतं….. अगं आवडतेच…..बाईक म्हणजे माझा जीव की प्राण….मी बऱ्याच ट्रिप्स ला बाईक वरच जातो…आमचा एक ग्रुप आहे…सगक्यांकडे बाईक…सगळे एकत्र निघतो रोड ट्रिप करत…..”
” अरे वाह….कुठे कुठे गेला आहात तुम्ही आतापर्यंत….”
” लोणावळा, गोवा, महाबळेश्वर, माळशेज घाट, इगतपुरी, अलिबाग, औरंगाबाद….अजून छोट्या मोठ्या बऱ्याच…..सलग दोन तीन सुट्ट्या आल्या की आम्ही घरी नसतोच….”
” मस्त रे…..नेक्स्ट कुठे जाणार आहेत ???”
” अजून काही नक्की नाही…आता २६,२७,२८ तीन सुट्ट्या आहेत ना लागोपाठ…तेव्हा जाऊ कुठे तरी….येणार का तू???” अविनाशने ब्रेक मारता मारता सहज विचारलं.
” मला नक्की आवडेल…पण मला घरून परवानगी मिळणं कठीण आहे जरा….”
” अच्छा…बघू तेव्हाच तेव्हा…..” अविनाश बाईक पार्क करत म्हणाला.
त्या नंतर अविनाश आणि रश्मी जवळपास एक तास त्या कॉफीशॉप मध्ये बसून गप्पा मारत होते. त्या दरम्यान त्यांना एकमेकांबद्दल बरंच समजलं…एकमेकांच्या आवडी निवडी, एकमेकांच्या सवयी, त्यांची विचार करण्याची पद्धत आणि अजून बरंच काही…
गप्पा मारून झाल्यावर अविनाश तिला तिच्या घरी सोडायला आला..तिने आजूबाजूला बघितलं पण तिचा पाठलाग करणारा मुलगा तिथे दिसला नाही..मग अविनाशला बाय म्हणून ती कॉम्प्लेक्सच्या गेट मध्ये शिरली…मागे वळून बघते तर अविनाश गेटवर नव्हता….तिने थोडं दूर बघितलं तर रात्रीच्या अंधारात अविनाशची बाईक वेगाने जाताना दिसली….अविनाश दिसेनासा होताच तिची पावलं आपोआप घराच्या दिशेने वळली.
क्रमशः
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
Loved this part💖😍👌
Thanks apu 😘❤