Friendship👥 vs Relationship💑


​”अमोल…..”

” हं…. बोल ना….”

“तुला काही तरी सांगायचंय….”

“बोला मॅडम….परवानगी कधी पासून घ्यायला लागलात…”

” I am not single anymore…”

” अरे वाह….finally कोणी तरी आवडलं तुला.. Congratulations..happy for u 😊”

“Thank you so much….😘”

“Bdw…. कोण आहे तो lucky champ…”

” धवल…माझ्याच स्कूल मध्ये होता…तेव्हा मला आवडायचा तो…पण हिंमत नाही झाली माझी कधी..गेल्याच महिन्यात त्याचा मेसेज आला होता…आणि काल त्याने विचारलं…”

“अच्छा…मस्त आहे…मला पण भेटवं कधी तरी..बघूया तरी कोण आहे….”

“हो नक्की भेटवीन.. तसही आपण एकत्रच तर असतो..”
नंतर नंतर दोघांचं contact कमी झालं. ती तिच्या life मध्ये busy आणि तिला disturb होईल या विचाराने तोही कधी स्वतःहून बोलायला गेला नाही. कधी तरी दोघे मेसेज वर बोलायचे.. पण ते तेवढ्यापुरतचं.. पहिल्या सारखं त्यांच्यात काही उरलं नव्हतं..एके कालचे best friends..पण आता फक्त फॉर्मलिटी म्हणून बोलणं व्हायचं..तो सगळं नीट आहे असं भासवायचा आणि तिला काय बिघडलय ते कळत नव्हतं. 

तसं बघायला गेलं तर दोघेही त्यांच्या जागेवर बरोबर होते.  Relationship मध्ये आल्यावर priorities बदलतातच. फक्त आपण relationship आणि friendship दोन्ही कसं सांभाळतो यावर सगळं अवलंबून असतं. 
काही दिवसांनी जाईला सुद्धा समजलं कि अमोलचं काहीतरी बिनासलय.. तो काही सांगत नसला तरी त्याच्या मनात काहीतरी आहे..मग एक दिवस तिनेच पुन्हा विषय काढला..

“अमोल..काय झालंय तुला ? बरेच दिवसांपासून मी बघतेय  तू नीट बोलत नाहीये..टाळतोयस मला..असा नव्हतास तू…आधी किती काही सांगायचास मला..माझं काही चुकलंय का??”

“नाही गं… काही पण असतं तुझं…मला काय होणार आहे..मी मस्त मजेत आहे..”

“हे झालं लोकांना सांगायचं उत्तर…आता मला अगदी खरं सांग..मी relationship मध्ये आली म्हणून तुला वाईट वाटलं का ??”

” हे बघ जाई… हे कधी न कधी तरी होणारच होतं. त्या बद्दल माझं काही म्हणणं नाहीये..पण relationship मध्ये आल्यापासून तुझ्या life मधली माझी जागा माझी नाही राहिलीय. सगळं बदललंय जाई.. फक्त या change शी जमवून घ्यायला मला जरा जड जातंय..बाकी काही नाही…तू माझं टेन्शन नको घेऊस.. माझा मी होईन ठीक काही दिवसांनी…”

“असं नसतं अमोल..तू माझ्यासाठी आधी जितका महत्वाचा होतास तितकाच आजही आहेस..तुझी जागा धवल सुद्धा घेऊ शकणार नाही. 

अमोल..प्रेम हे कधी कमी जास्त नसतं.. ते सगळ्यांना साखरच मिळतं.. even आपल्या आई बाबांसुद्धा अशी भीती वाटत असते की मुलीचं लग्न झालं की तिचं आपल्यावरचं प्रेम कमी होईल..पण प्रेम हे सगळ्यांना पुरून उरतं…”

” हे सगळं बोलायला खूप सोपं आहे जाई…पण शेवटी सावरायला वेळ हा लागतोच ना…मी हि सावरेन यातून..फक्त थोडासा वेळ लागतोय इतकंच…या गोष्टीचा मी कधी विचारच नव्हता केला…हे सगळं इतकं अचानक घडलं कि काय करावं तेच मला  समजत नव्हतं.. पण शेवटी relationship आणि friendship यामध्ये एका नात्याला वेळेनुसार झुकतं माप द्यावं लागतंच…या सर्व गोष्टींमुळे आपल्या friendship वर काही परिणाम होणार नाही एवढं फक्त आपल्याला बघायचंय..तेवढं जर आपल्याला जमलं तर दोन्हीही नाती टिकून राहू शकतात…”

–                                               प्रतिक प्रवीण म्हात्रे

3472cookie-checkFriendship👥 vs Relationship💑

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

4 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 120,447 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories