लोक काय म्हणतील ????

​एखादी मुलगी किंवा मुलगा , एवढ्या रात्री, म्हणजे  बारा वाजल्यानंतरसुद्धा ती किंवा तो online का आहे ? मोठ्ठा प्रश्न…तिचं कोणाबरोबर अफेअर चालू आहे का? ती कोणाशी बोलतेय एवढं…….असे अनेक प्रश्न..
एखादी मुलगी वेस्टर्न style चे कपडे घालून बाहेर पडली….तर…हिच्या घरच्यांचा हिला काही धाक नाही का?? बाहेर वावरताना कसे कपडे घालावे इतकं साधं कळत नाही तिला…एवढंच नाही..मी तर असं एका वृद्ध जोडप्याकडून असं हि ऐकलं होतं की मुली इतके छोटे कपडे घालतील तर बलात्कार होणारचं…कपड्यांचा आणि बलात्काराचा काय संबंध…साडी किंवा ड्रेस घातलेल्या मुलींवर सुद्धा बलात्कार होतातच ना…हा दोष जसा मुलींचा नाही तसाच मुलांचा सुद्धा नाहीये…मागेच एकदा माझ्या वाचनात असं आलं होतं की बलात्काराच्या आरोपात दोषी आढळलेल्या एका अल्पवयीन मुलाला एका पत्रकाराने विचारलं असता त्याने जे उत्तर दिलं ते अगदीच धक्कादायक होतं.. “मी काय चुकीचं केलं हेच मला माहित नाही…मी जे बघितलं ते मला करून बघायचं होतं…. त्याची मला एवढी मोठी शिक्षा मिळेल हे मला माहीतच नव्हतं”..थोडक्यात काय तर काही तरी चुकीच बघून, वाचून भलतच काहीतरी घडण्यापेक्षा त्यांच्या पालकांनी त्यांना योग्य वयात सर्व गोष्टींची जाणीव करून दिली तर त्यांच्या कडून अशा चुका होणार नाहीत…
जर एखाद्या मुलाने मुलीसोबत किंवा मुलीने मुलासोबत फोटो टाकला तर त्या वरून किती issues….. लोक काय म्हणतील ??  तुमचं लग्न ठरायला प्रॉब्लेम होईल…पण आताचा काळचं तसा आहे की जर एखादी मुलगी तुमची friend असेल तर तसंच एखादा मुलगा तुमचा friend असू शकत नाही का?? मुलाबरोबर फक्त नवरा किंवा boyfriend एवढंच नातं असतं का ??  ग्रुप म्हटला कि त्यात मुलं मुली ह्या आल्याचं ना…आणि तुम्ही हे विसरता कि जेव्हा तुमच्या मुलांना त्यांच्या अभ्यासात काही अडचणी येतात किंवा कोणती assignment पुर्ण करायची असेल तेव्हा या मुलीच त्यांना मदत करतात..काळानुसार आपण आपले विचार सुद्धा बदलायला हवेत..जर जुन्या काळाप्रमाणे चालायचं ठरवलं तर मग बालविवाहाची प्रथा सुद्धा सुरु करावी लागेल…
मित्रांसोबत बाहेर फिरायला चालला आहेस ?? काय घेऊ वगैरे नको…कोल्ड ड्रिंक मध्ये काहीतरी मिक्स करून देतील..मित्र चांगले नसतात…वाईट सवयी लावतात..bla…bla..bla..आपला मुलगा बिघडला कि घरचे सरळ मित्रांच्या नावाने बिल फाडून मोकळे होतात…पण त्यांना हे माहित नसते…कि गंगाधरच शक्तीमान आहे…मुळात कोणतेही आई वडील त्यांच्या मुलावर किंवा मुलीवर कधी वाईट संस्कार करत नाही..फक्त अवास्तव काळजीमुळे आपल्याला मुलाला किंवा मुलीला जास्ती बंधनात ठेवण्यात सुद्धा काही अर्थ नाहीये…
काळानुसार बदल हा हवाच…तुम्ही तुमच्या शाळा कॉलेज च्या दिवसात त्या गोष्टी करत नव्हतात म्हणून तुमच्या मुलामुलींनीही त्या करू नये असा अट्टाहास का ?? तेव्हाचा काळ वेगळा होता, लोकांची मानसिकता वेगळी होती …आता ती बदलत आहेत तर आपण सुद्धा त्या बदलाचा एक भाग व्हायला हवं…
–                   प्रतिक प्रवीण म्हात्रे

3400cookie-checkलोक काय म्हणतील ????

Related Posts

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

2 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 117,915 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories