आठवणीतला प्रवास…(भाग ३)
ट्रॅफिकचा त्रास टाळण्यासाठी आमच्या ड्रायव्हर ने कोणत्या तरी दुसऱ्या रस्त्याने गाडी वळवली. त्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ थोडी कमीच असते पण त्या दिवशी पाऊस पडत असल्याने एक टॅक्सी आणि आमची गाडी एवढेच काय ते एकमेकांचे सोबती होतो. आमच्या ड्रायव्हर ला सुद्धा तो रस्ता नीटसा माहित नव्हता.मग टॅक्सीवाल्याचा माग काढत कसेतरी आम्ही मुख्य रस्त्याला लागलो.
रात्री बारा साडे बारा वाजता डिनर करून आणि शिमल्यावरून निघताना झालेल्या भांडणाचा काय तो सोक्षमोक्ष लावून आम्ही मनालीला जायला निघालो.साधारणतः सकाळी चार वाजे पर्यंत मनालीला पोहोचू असा आमचा अंदाज होता. रात्री दोन वाजता कुलूला पोहोचलो आणि सर्व जण ज्याची अगदी चातकासारखी वाट पाहत होते तो snow fall सुरु झाला आणि सर्वांचे चेहेरे खुलले..जे बघण्यासाठी इतक्या लांब आलो ती इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
पुढे रस्त्यावर बराच बर्फ जमा झाला आहे, गाडी जाऊ शकणार नाही असा फोन आल्याने आमच्या ड्रायव्हरने गाडी एका शाल फॅक्टरी च्या समोर उभी केली आणि सकाळी पुढे निघू असं ठरलं.
कुलू ते मनाली हा साधारण एक तासाचा रस्ता… आता जाऊन मस्त पैकी आराम करायचा आणि मग संध्याकाळी मॉल रोडला भटकायला जायचं असे अनेक प्लॅन्स तयार होत होते..पण आमच्या पुढे काही तरी वेगळंच वाढून ठेवलं होतं. आम्ही थोडं पुढे गेलो आणि पुन्हा ट्रॅफिक लागलं. तास झाला, दोन तास झाले तरी ट्रॅफिक सुटण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. Snow fall तर वाढतंच होता.दुपारचे बारा वाजत आले तरीही परिस्थिती तशीच होती.
सुरवातीला snow fall बघून खुश झालेली मंडळी आता snow fall कधी थांबेल याची वाट पाहत होती.. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते..बिस्कीट , वेफर्स तरी खाऊन खाऊन किती खाणार ना….शेवटी आम्ही काही जणांनी हि जबाबदारी स्वीकारून , बर्फातून वाट काढत सगळ्यांसाठी मॅगी ची व्यवस्था केली..आम्ही जेव्हा मॅगी घेऊन निघालो तेव्हा कळलं की आमची बस खूप पुढे निघून गेली आहे. दुसऱ्या दोन बस थोड्या जवळच होत्या..त्या दोन बस मध्ये मॅगी ची पॅकेट्स देऊन आम्ही आमची बस शोधत पुढे निघालो. त्या दिवशी मी जितका चाललो तितका मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी चाललो नसेन..पण पर्यंत नव्हता..कसे तरी धावत पळत, धडपडत, वाहनांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही आमच्या बस पर्यंत पोहोचलो.पाय अगदी सुन्न झाले होते…अंगाला कापरा भरला होता..पण सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून तो त्रास कुठल्या कुठे पळाला.
पुढे कशीतरी वाट काढत, मध्येच गाडीला धक्का देत आम्ही मनालीला पोहोचलो..तिथे पोहोचल्यावर समजलं की आमचं हॉटेल डोंगराच्या एकदम टोकावर आहे..आणि त्या रस्त्यावर सुद्धा बर्फ साचल्यामुळे गाडी पुढे जाणार नव्हती..मग काय…पुन्हा नशिबी पायपीटच… आम्ही वैतागून चालत निघालो पण नंतर मजा मस्ती करत हॉटेलवर कसे पोहोचलो आमचं आम्हालाही कळलं नाही…सकाळी चार वाजता जे आम्ही मनालीला पोहोचणार होतो ते संध्याकाळी पाच वाजता पोहोचलो..या तेरा तासात आम्ही जे काही अनुभवलंय ते विसरता येणं कधीच शक्य नाहीेये..एवढा खडतर प्रवास मी माझ्या आता पर्यंतच्या आयुष्यात तरी कधी केला नव्हता..
क्रमशः
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment