महिला दिन 👧👩

​आज जागतिक महिला दिन….. सगळे जण व्हाट्स अँप च्या ग्रुप वर, फेसबुक वर महिलांबद्दल कृतज्ञता दर्शविणाऱ्या पोस्ट्स टाकत आहेत…बस…फक्त आजचा दिवस..उद्याच काय??? इतर दिवशी आपण खरंच महिलांचा आदर करतो का? त्यांना मानाची आणि योग्य वागणूक आपण देतो का? कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला ठराविक दिवसाची वाट बघावी लागते हेच किती मोठं दुर्दैव आहे…

            फक्त आजच्या दिवशी महिलांबद्दल आदर, त्यांना काय तो मान..आणि इतर दिवशी….विनयभंग, अत्याचार, बलात्कार ??? आजकाल माहिलांवरच्या अत्याचाराच प्रमाण किती तरी वाढलंय..वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर महिलांवर, मुलींवर झालेल्या अत्याचारांची बातमी असतेच असते…ते का होतात, कशा मुळे होतात हा भाग वेगळा…पण या मुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर किती तरी बंधनं लादली जातात. रात्री जास्ती वेळ बाहेर राहायचं नाही, मॉडर्न कपडे वापरायचे नाही, एकटं कधी कुठे जायचं नाही..अनेक पालक त्यांना त्यांचं आयुष्य नीट जगू हि देत नाहीत..त्यांना सदा न कदा हीच चिंता…काळजी करा पण एका मर्यादेपर्यंत..तुमच्या मुलीलाही स्वतःची काळजी हि आहेच..आणि ज्या गोष्टीमध्ये ती comfortable नाही ती गोष्ट ती कधीही करणार नाही…

               आहेत असे अनेक जण जे मुलींकडे फक्त आणि फक्त वासनेच्या नजरेनेच बघतात..आणि त्यात एखादी मुलगी one piece वर किंवा शॉर्टस मध्ये दिसली कि भुकेलेला वाघ ज्या प्रमाणे आपल्या सावजाकडे कडे बघत असतो काहीशी तशीच भावना त्यांच्या नजरेत असते..मुलींकडे बघणं आणि मुलींकडे वाईट नजरेने बघणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे….असं जर कधी तुमच्या बाबतीत झालंच तर सरळ त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन त्याच्याकडेच बघत बसायच..शेवटी त्याचीच नजर तुमच्या वरून हटल्याशिवाय राहणार नाही. जर आपण स्त्रियांचा आदर केला तर आपलं बघून चार लोक आपलं अनुकरण करतील.

       स्त्रियांची सुरक्षा हा आज आपल्या देशातला मोठा गहन प्रश्न बनला आहे..सरकार त्या साठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे..पण आपण सुद्धा आपल्या परीने प्रयत्न हे करायलाच हवेत..

     पण….स्त्रियांसाठी सरकारने जे कायदे केले आहेत त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी सुद्धा आपण घ्यायला हवी….गेल्याच वर्षी पेपर मध्ये बातमी आली होती….एका जोडप्याचे दोन वर्षे प्रेम संबंध होते..काही कारणाने त्यांच्यात वाद झाले..त्या मुलीने बलात्काराची खोटी तक्रार त्या मुलाविरोधात नोंदवली.. पोलिसांनी देखील काहीही चौकशी न करता त्या मुलीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्या मुलाला यथेच्च बदडून काढला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.. तुम्हाला दिलेले अधिकार तुम्ही वापरा पण त्यामुळे कोणाचं आयुष्य विनाकारण बरबाद होणार नाही ना याची सुद्धा काळजी घेतलेली बरी…

            अजून एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडला होता..ट्रेन चा प्रॉब्लेम असल्यामुळे बोरिवली स्टेशनवर बऱ्या पैकी गर्दी होती..त्या गर्दीत एका मुलीला चुकून एका माणसाचा धक्का लागला..त्या मुलीच्या बापाने त्याच्या कानाखाली मारली..त्या मुलीकडे बघून असं वाटतही नव्हतं कि कोणी हिला ठरवून सुद्धा धक्का देऊ शकेल..आणि तो माणूस सुद्धा इतका फालतु वाटत नव्हता..त्या माणसाने तिच्या बापाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो काही समजण्याच्या मनस्थितीत नसावा बहुतेक..त्या माणसाने आपल्याला मुद्दाम धक्का नाही मारला हे माहित असूनसुद्धा त्या मुलीने तोंडातून एक चकार शब्द सुद्धा काढला नाही..शेवटी एक दोन लोकांनी त्या माणसावर हात साफ करून झाल्यावर हे प्रकरण मिटलं..

          स्त्रियांनी सुद्धा त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवलाच पाहिजे..समाज काय म्हणेल या भीतीने तुम्ही तो अत्याचार सहन करता आणि मग अशा लोकांच फावतं. अन्याय सहन करणारा सुद्धा अन्याय करणाऱ्या इतकाच दोषी असतो..जात तुम्ही थोडीशी हिम्मत दाखवलीत तर तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिम्मतसुद्धा होणार नाही.

            शेवटी काय..संकट आलं की ‘देवा मला वाचवं’ असं व्हायला नको..नाही तर आज महिला दिन आहे म्हणून सगळे या गोष्टी लक्षात ठेवतील आणि उद्या पासून येरे माझ्या मागल्या…असं होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे..
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
–                                                प्रतिक प्रवीण म्हात्रे

2970cookie-checkमहिला दिन 👧👩

Related Posts

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

1 Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 116,979 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories