Site icon PRATILIKHIT

आठवणीतला प्रवास…(भाग २)

Advertisements

           

              रोजच्या सवयीप्रमाणे मला भल्या पहाटेच जाग आली. हवेतला गारवा बऱ्यापैकी कमी झाला होता. पण आपल्या वातावरणापेक्षा तापमान जरा कमीच होतं. थोड्या वेळाने आमचा tour coordinator आम्हाला उठवायला आला. मला जाग पाहून त्याला जरा आश्चर्यचं वाटलं…मग सगळ्यांना उठवायला सांगून तो पुढच्या खोलीतल्या मुलांना उठवायला गेला..सगळं आवरून  बाल्कनीतून दिसणाऱ्या सुर्योदयेचे दृश्य कॅमेऱ्यात कैद करून आम्ही नाश्त्यासाठी गेलो. नाश्त्याला ब्रेड जॅम पाहताच सर्वांची तोंडे वाकडी झाली. कसा तरी तो सुका नाश्ता संपवून आम्ही पुढील प्रवासासाठी तयार झालो..

             शिमला ते  कुफ्री  हा साधारण चार तासाचा प्रवास होता…कुफ्री ला snow fall होत आहे या अफवेमुळे सर्वांना कधी एकदा कुफ्रीला पोहोचतोय असं झालं होतं. कुफ्रीला पोहोचलो तर snow चा काही पत्ताच नव्हता..थोडं फार इकडे तिकडे फिरल्यावर आम्ही घोड्यावर बसून डोंगराच्या माथ्यावर जायला निघालो.. घोड्यावर बसण्याची ती पहिलीच वेळ नव्हती पण तरी सुद्धा थोडीशी भिती हि वाटत होतीच…मजा मस्ती करत आम्ही डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो..गार वारे सुटले होते..थंडी घालवण्यासाठी त्या पाण्यासारख्या चहा शिवाय पर्याय नव्हता..याक, ससे असे प्राणी त्यांच्यासोबत येऊन फोटो काढण्याच्या हौशी पर्यटकांची वाट पाहत होते.  काही साहसी जण तिथे असलेले adventures पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते.  

           साधारण पणे तीन तास कुफ्रिच्या त्या डोंगरांवर फिरून, बरेचसे फोटो काढून आम्ही पुन्हा तो डोंगर उतरायला सुरुवात केली..डोंगर उतारावर मोठ्या कौशल्याने बांधलेल्या त्या घरांच्या बांधणीच नवल करावं तेवढं थोडंच होतं.कुफ्रिवरून निघालो तेव्हाच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली होती.  संध्याकाळी शिमल्याच्या हॉटेलच्या जवळ पोहोचलो तेव्हा पावसाची रिपरिप सुरु झाली होती. आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि हॉटेलमध्ये जाणार इतक्यात पावसाचा जोर वाढला..कसेबसे आम्ही हॉटेलवर पोहोचलो. दुपारचं जेवण संध्याकाळी सहा वाजता करून आम्ही पाऊस थांबण्याची वाट पाहत होतो..थोड्या वेळाने पावसाचा जोर कमी झाला आणि मग आमच्यातल्या काही जणांनी सगळ्यांचं सामान गाडीत चढवलं. शिमलासारख्या ठिकाणी चालू पावसात मला थोड्याच अंतरावर एक अंडीवाला दिसला. उकडलेली अंडी पाहून आम्हाला झालेल्या आनंदाचं वर्णन करावं ते काय..पावसात नाचणारा मोर जसा आनंदी असतो तशी काहीशी आमची अवस्था झाली होती..हॉटेल मध्ये जेवूनसुद्धा आम्हाची भूक शांत झाली नव्हती..मग काय..आम्ही मस्तपैकी उकडलेल्या अंड्यांवर ताव मारला.जेव्हा आम्ही मनालीला जाण्यासाठी निघालो तेव्हा पावसाने पुन्हा जोर धरला होता..आणि रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती…

-.                                                             क्रमशः

2940cookie-checkआठवणीतला प्रवास…(भाग २)
Exit mobile version