Social Networking
ऑर्कुट चा जमाना गेला मित्रा
आहे आता व्हाट्सअप फेसबुक
कॉम्पुटर वरचं बसतयं पोरगं
सोडून पॉकेमोन, जंगल बुक
कोणीतरी गेल्याची बातमी
व्हाट्सअप सर्वांना सांगतंय
घरी मुलगी आली की मुलगा
फेसबुकवरनं शेअर होतंय
लहान मुलं विचारतयं
काय काका तुम्ही व्हाट्सअप वर नाही
वयस्कर माणसं म्हणतायेत
आता मोबाईल शिकण्याशिवाय पर्याय नाही
यांना कोणीतरी काहीतरी फॉरवर्ड करतंय
मेसेज शेअरिंग चा यांना म्हणे टॉक टाइम मिळतोय
दहा लोकांना मेसेज पाठवून यांना देव प्रसन्न होतोय
जे मंदिरात जातात त्यांची मात्र अजून परीक्षाच बघतोय
सोशल नेटवर्किंग च्या निमित्ताने का होईना
आम्ही कनेक्टेड तरी राहतोय
डेटा पॅक परवडत नाही आता
म्हणून फ्री वायफाय शोधत फिरतोय
परदेशात असलेला मुलगा
मुलीचे फोटो स्क्रीनवर पाहतोय
Online कांदेपोहे कार्यक्रम उरकून
Amazon वर लग्नाची शॉपिंग करतोय
आता व्हाट्सअप वर पण videocall आलाय
सर्व पुरुष टेन्शन मध्ये असतील
बायकोचा फोन घेण्यापूर्वी
ऑफिस बॅकग्राऊंड शोधतील
सोशल होतोय आम्ही
पण किती याचं भान ठेवायला हवं
किमान वर्षातून एकदा तरी
आपल्या माणसांशी भेटून बोलायला हवं
_ प्रतिक प्रवीण म्हात्रे
खरचं आपल्याा माणसांना प्ररत्यक्ष भेटण्यात जो आनंद तो कशातच नाही…खूपचं छान लिहीली आहे कविता👌👌👌