Uncategorized
ती सध्या काय करते….
पहिली भेट झाली ती दुसरीच्या वर्गामध्ये
वाढत गेली मैत्री डबे, पुस्तकं शेअर करण्यामध्ये
आता उत्सुकता मात्र एकचं असते
ती सध्या काय करते…..
एकमेकांकडे चोरून बघण्यात
मैत्रीची (कि प्रेमाची) एक भावना असायची
खेळताना कुठे धडपडलो
तर पहिली काळजी तिला असायची
आता उत्सुकता मात्र…….
शाळेच्या दिवसात प्रेम म्हणजे काय
हेच माहीत नव्हते
जेव्हा माहित झाले तेव्हा
आमच्यातले संबंध एवढे चांगले नव्हते
आता उत्सुकता मात्र……
या धावपळीच्या जीवनात
रस्त्यात कधी तरी भेटावं तिने
नेहमीची rachel mcadams सारखी स्माईल देऊन
ओळखलं का मला? विचारावं तिने
आता उत्सुकता मात्र एकचं असते
ती सध्या काय करते…..
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
Waow Pratil naice poyum khoop chan as usual keepit up