बदल
बघता बघता इथे
सर्वच काही बदलून गेलं….
बदलली आपली शिक्षणव्यवस्था
विद्यापीठ पैसा कमावण्याचं साधन बनली
तुमच्या पात्रतेवर नाही तर
तुमच्या खिशातल्या पैशावर admissions मिळू लागली
संपर्काची साधने बदलली
पत्रं, तार यांची जागा टेलिफोन ने घेतली
टेलीफोन चा upgrade मोबाईल आला
Call करायचं सोडून आम्ही msg करू लागलो
काळ बदलला तश्या आवडीनिवडी बदलल्या
घरच्या जेवणापेक्षा बाहेरचं चांगलं वाटू लागलं
शास्त्रीय संगीतापेक्षा DJ चा आवाज कानांना गोड वाटू लागला
Western culture च्या नावाखाली राहणीमान बदललं
गणपती,नवरात्री,दहीहंडी
स्पर्धा भरवण्याचं व्यासपीठ बनलं
आपल्या देशाबद्दलच प्रेम कमी होऊन
परदेशाबद्दल अप्रूप वाटू लागलं
बघता बघता इथे सर्वच बदलून गेलं
– प्रतिक प्रवीण म्हात्रे
nice…..:) 🙂
Good one Pratik. Keep it up!
खरच बघता बघता इथे सर्वच बदलून गेलं
Mast re pratik