मराठी माणूस

कोणीतरी महाराष्ट्रात येणार
काही मिळेल ते खाणार
वेळप्रसंगी उपाशी राहणार
काय पडेल ते काम करणार
मग कमावलेला सगळा पैसा
गावाला नेऊन वाटणार
आणि मराठी माणूस…….फक्त बघतच बसणार

कोणीतरी महाराष्टात येणार
टॅक्सी,रिक्षाचं लायसन पैसे देऊन घेणार
थोडे दिवस मुंबई फिरणार
मग मुंबई आपल्या बापाचीच समजणार
आणि मराठी माणूस…….फक्त बघतच बसणार

कोणीतरी महाराष्ट्रात येणार
आपल्या लोकांत सुखात नांदणार
मग त्यांची युनिटी करून
किती सहज दादागिरी करणार
आणि मराठी माणूस…….फक्त बघतच बसणार

कोणीतरी महाराष्ट्रात येणार
पहिले रस्त्यावर राहणार
नंतर तो रस्ताच ताब्यात घेणार
राहत्या जागेत एका वर्षात
दहा घर गुपचूप बांधणार
आणि मराठी माणूस…….फक्त बघतच बसणार

कोणीतरी महाराष्ट्रात येणार
लोकलमध्ये ग्रुप बनवणार
सगळ्या जागा अडवून बसणार
आमची मुंबई असूनसुद्धा
आम्ही उभ्याने प्रवास करणार
कोणी टोकलं,तर लगेच हात उचलणार
आणि मराठी माणूस…….फक्त बघतच बसणार

कोणीतरी महाराष्ट्रात येणार
इडली डोसा, भेळपुरी ची गाडी टाकणार
स्वस्त मिळते म्हणून
आपणही तिकडेच जाणार
आपल्या जीवावर हे लोक मोठे होणार
आपले धंदे हे लोक ताब्यात घेणार
आणि मराठी माणूस…….फक्त बघतच बसणार

कोणीतरी महाराष्ट्रात येणार
कमी पगारात नोकरी करणार
आमच्या नोकऱ्या हे लोक घेऊन जाणार
इतकं शिकूनसुद्धा आम्ही बेरोजगारच राहणार
आणि मराठी माणूस…….फक्त बघतच बसणार

कोणीतरी महाराष्ट्रात येणार
त्यांचे सण इथे साजरे करणार
आपण आपले परंपरागत सण सोडून
त्यांच्यात सहभागी होणार
त्यांना एवढं जवळ करूनसुद्धा
एक दिवस ते आपल्याच कंबरेत लाथ घालणार
आणि मराठी माणूस…….फक्त बघतच बसणार

कोणीतरी महाराष्ट्रात येणार
शिवाजी,संभाजी कोण म्हणून विचारणार
आमच्या दैवतांची विटंबना करणार
आमच्या राज्यात येऊन
आम्हालाच आमची जागा दाखवायच्या गोष्टी करणार
आणि मराठी माणूस…….फक्त बघतच बसणार

कोणीतरी महाराष्ट्रात येणार
आपापसातले हेवेदावे विसरून एकत्र होणार
आणि एक दिवस हेच लोक
अख्खा महाराष्ट्र विकायला काढणार

आणि इतकं सगळं होऊनसुद्धा
मराठी माणूस…….फक्त बघतच बसणार

–                                     प्रतीक प्रवीण म्हात्रे

630cookie-checkमराठी माणूस

Related Posts

Engineer

Engineer

कार्यकर्ता

कार्यकर्ता

स्मार्ट फोन

स्मार्ट फोन

जगण्यात मौज आहे…

जगण्यात मौज आहे…

8 Comments

 1. Beta Pratik u write very well n its very touchy n also too important for Our Marathi people ……. I suggest u to make a video of ur writing on WhatsApp ,youtube or any another social media. My personal opinion is as I said above n I salute ur writing…..keep it up….. I expect more from ur writing…….. God bless u.

 2. Hi Pratil; I am female fan of urs
  I like d wayy u write this rhymes. Pls write seperetely on beuty of marathi mulgis. Thanking you in anticipation

 3. Hi Pratik,

  you write really well…read all your posts after reading this one…you exhibit maturity levels rare at your age….particularly on this poem though, I have slightly different opinions….people come here to work as there is scope…we (Marathi) don’t want to do laborious jobs and chose mostly white collar ones…as you have selected Engineering…sulking and spreading hatred doesn’t improve anything…Americans hate it when Indians grab jobs in their country but we feel proud when our people secure jobs there….many Indians are now American citizens…some of them are politicians there…in this world you cannot / should not restrict people based on their origin…

  your writing has impact and I am sure you will put it to good use…Well done & Good luck !!

 4. Pratik this is beyond marvellous and moreover this is a true fact what you have written. माझी मराठी इतकी चांगली नाही आहे पण ही कविता वाचायला खूप आनंद झाला. लय भारी😀

Leave a Reply

Blog Stats

 • 120,410 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories