आयुष्य…
लोक म्हणतात,
आयुष्य खुप छोट आहे
पण अस बिलकुल नसतं
आपण जगायलाच उशिरा सुरवात करतो
सहज सोप्या आयुष्याला आपण
उगाच complicated करून टाकतो
जे आपल्याकड़े आहे
ते सोडून आपण भलत्याच्याच मागे लागतो
आपल्याला जे मिळालय
त्यावर समाधान मानेल तो माणूस कसला
जे पाहिजे ते मिळाल की
त्याला अजून हवं असतं
आपल्या आयुष्याचा जास्ती वेळ
आपण आपल्याकडे काय नाही
ते मिळवण्यात घालवतो आणि ते मिळ्याल्यावर
माणूस सुखी होइलच
याचीही शाश्वती नाही
आपल आयुष्य कसं जगाव
हे आपल्या हातात असतं
पण आपण उगाच स्वतःच्या
नशिबाला दोष देत असतो
आणि दुसऱ्यांच्या सुखी जीवनाचा हेवा करत बसतो
आयुष्य खुप सुंदर आहे
फक्त ते जगता आल पाहिजे
तेच लोकांना जमत नाही
आणि मग
लोक म्हणतात,
आयुष्य खुप छोट आहे
पण अस बिलकुल नसतं
आपण जगायलाच उशिरा सुरवात करतो
_ प्रतिक प्रवीण म्हात्रे
खूप छान…प्रतीक! 👍
Sundar👌
अप्रतिम
Tysm mruga,apurva,sarvesh